आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 मिनिटात 30 हजार रुपयांचा किराणा चोरी, चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - वाघनगर स्टॉपवर असलेल्या सद्गुरू प्रोव्हिजन्स या किराणा दुकानाचे कुलूप कापून चोरट्यांनी १५ मिनिटात ३० हजार रुपयांचा किराणा माल लंपास केला. गुरुवारी मध्यरात्री ३.१८ ते ३.३३ यादरम्यान ही घटना घडली. सद्गुरू प्रोव्हिजन्स हे उमरावसिंग जुलालसिंग पाटील यांच्या मालकीचे दुकान आहे. 
 
पाटील यांनी गुरुवारी रात्री ९.३० वाजता दुकान बंद केले. त्यानंतर ते घरी निघून गेले होते. मध्यरात्री वाजून १८ मिनिटांनी कॅपचे स्वेटर घातलेले दोन चोरटे त्यांच्या दुकानासमोर आले. शेजारच्या शिवम ट्रेडर्सच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात हे दोघे चोरटे कैद झाले आहेत.
 
 रात्री ३.१८ वाजता चोरट्यांनी पाटील यांच्या दुकानावर लावलेला लाइट काढून अंधार केला. त्यानंतर त्यांनी कटरच्या साह्याने दुकानाचे दोन्ही कुलूप कापले. शटर उघडून ते दुकानात शिरले. दुकानात ठेवलेल्या लवंग, वेलदोडा, चहापत्ती इतर किराणा माल ठेवलेले एक पोते उचलून चोरट्यांनी पलायन केले.
 
दुपारी ३.३३ वाजता ते दुकानातून बाहेर पडताना पुन्हा सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहेत. हे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी सकाळी वाजता शेजारच्या दुकानातील वाहनचालक अनिल यांना पाटील यांच्या दुकानाचे शटर उघडे दिसले. त्यांनी चौकशी केली असता चोरी झाल्याचे लक्षात आले. अनिल यांनी पाटील यांच्या घरी फोन करून माहिती दिली. 

दिवसभर पाहणी, गुन्हा दाखल नाही 
पाटील यांनी या घटनेची माहिती सकाळीच रामानंदनगर पोलिसांना दिली हाेती. दिवसभरात दोन वेळा पोलिसांनी दुकानात येऊन चौकशी केली. मात्र, गुन्हा दाखल केला नाही. रात्री वाजेच्या सुमारास पाटील यांना पोलिस ठाण्यात बोलावले होते. 
 
बातम्या आणखी आहेत...