आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटन अडचणीत, नैसर्गिक आपत्तीमुळे पर्यटकांच्या संख्येत १५ टक्के घट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- काश्मीरचे नंदनवन पाहण्यासह वैष्णोदेवी, अमरनाथ या धार्मिक स्थळांकडे शहरातून जाणाऱ्यांचा ओढाढा कमी झाला आहे. पाऊस इतर नैसर्गिक आपत्तींमुळे पर्यटकांसह भाविकांनीही परराज्यात जाण्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे जवळपास १५ टक्के पर्यटन सहली घटल्या आहेत. दाेन वर्षांत पर्यटकांच्या संख्येत २० टक्के घट झाली आहे.

पर्यटन करण्यासाठी काही जण खासगी वाहनांना तर काही यात्रा कंपन्यांना प्राधान्य देतात. त्यातही ट्रॅव्हल्स, रेल्वे, विमान अशा विविध दळणवळणाच्या साधनांद्वारे आयोजित होणाऱ्या यात्रांचे पॅकेज देणाऱ्या विविध टुरिस्ट कंपन्यांची कार्यालये शहरात सुरू झाल्याने नागरिकांची चांगली सोय झाली आहे. दरवर्षी काही हजार नागरिक अशा प्रकारच्या यात्रांचा आनंद घेतात. मात्र, काही वर्षांतील निसर्गाच्या बदलामुळे नैसर्गिक आपत्ती येते. त्यात महापूर, भूकंप आदींमुळे पर्यटनाला जाणाऱ्यांवर परिणाम झाला आहे. शहरात अनेक वर्षांपासून चौधरी यात्रा कंपनीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या यात्रांचे नियोजन केले जाते. तसेच आता भटकंती, शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातूनही यात्रांचे नियोजन करून नागरिकांना पर्यटनाचा आनंद घेता येत आहे. त्यामुळे पर्यटनाला जाणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदविस वाढ होत असली तरी गेल्या वर्ष-दोन वर्षांत बद्रनिाथ, नेपाळ आदी ठिकाणांसह गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार पंजाब या राज्यात महापूरसारख्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पर्यटन करणाऱ्यांच्या संख्येत गेल्या दोन वर्षांत १५ ते २० टक्के घट झाली आहे.

धार्मिक क्षेत्रांना पसंती
राज्यासहदेशात अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यापैकी धार्मिक स्थळांच्या पर्यटनाला नागरिकांकडून अधिक पसंती दिली जाते. नोकरदार व्यापारी हे पर्यटन करताना धार्मिक स्थळांसह निसर्गसौदर्याने नटलेल्या परिसराला अधिक पसंती देत असल्याचे पर्यटन व्यवसायाशी संबंधितांचे म्हणणे आहे. त्यात दक्षिण भारत, काशी, द्वारका, वैष्णोदेवी आदी ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

याकाळात अधिक पसंती
प्रामुख्यानेवर्षभरातील दाेन काळात पर्यटनाला अधिक पसंती दिली जाते. दविाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये अनेक जण पर्यटनाला जातात. ऑक्टोंबर ते नोव्हेंबर आणि एप्रिल ते जून या काळात पर्यटकांची संख्या नेहमीपेक्षा दुप्पट असते. त्यातही कुटुंबासह ग्रुप करून जाणारे अनेक जण असतात.

माहिती देण्याचे आवाहन
पर्यटनालाजाणाऱ्यांबद्दल फारशी माहिती प्रशासनाकडे ठेवली जात नाही. तसेच तशी काेणतीही माहिती यात्रा कंपन्यांकडूनही िदली जात नाही. मात्र, आपत्तीवेळी संपर्क करणे सोयीचे व्हावे या उद्देशाने यात्रेला जाणारे नागरिक, त्यांचे नातेवाईक आदींची माहिती संबंधित आयोजकांनी घेऊन त्याची एक प्रत प्रशासनाकडे दिल्यास मदतकार्य करणे सोयीचे होते. त्यामुळे प्रशासनाकडून
याबाबत नेहमीच आवाहन केले जाते.
देश-विदेशात अनेक प्रकारच्या आणि अनेक ठिकाणच्या यात्रांचे आयोजन आम्ही करत असतो. नैसर्गिक आपत्तीचा परिणाम पर्यटनावर नशि्चितच जाणवतो. असे असले तरी एक काेटीपेक्षा अधिकची बुकिंग वर्षभरात आमच्याकडे होत असते. इतर स्पर्धकांशी सामना करताना पर्यटकांना
विविध प्रकारचे पॅकेज द्यावे लागते.
पर्यटनाचीआवड हाैस असलेले कोणत्याही प्रकारची भीती ठेवता आनंद घेत असतात. त्यामुळे भूकंप, महापूर यासारख्या घटनांमुळे म्हणावा तसा फारसा परिणाम जाणवत नसला तरी नागरिकांचे सुरक्षित स्थळी प्रवासाला प्राधान्य आहे. किरणशिंदे, संचालक,महालक्ष्मी टूर्स
श्री.ठाकरे,व्यवस्थापक,चौधरी यात्रा कंपनी
बातम्या आणखी आहेत...