आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१५ वर्षे बेकायदेशीर नाेकरी; दोन डॉक्टरांची नियुक्ती रद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गेल्या१५ वर्षांपासून तत्कालीन नगरपालिका आणि सध्याच्या महापालिकेत बेकायदेशीर वैद्यकीय पदावर कार्यरत दोन डॉक्टरांची सेवा समाप्त करण्याचे आदेश आयुक्त जीवन सोनवणे यांनी शुक्रवारी दिले. उच्च न्यायालयाच्या २०१५ च्या निकालानुसार ही कारवाई करण्यात आली. यात मानधन तत्त्वावरील याचिकाकर्ता डॉक्टरासह २०१३ पासून कायम अास्थापनावरील डॉक्टराचा समावेश आहे. तसेच गेल्या चार वर्षांत कायम अास्थापनावरील डॉक्टरला दिलेले सुमारे १७ लाख रुपयांचे मानधन वसूल करण्यासाठी याचिकाकर्ता पुन्हा न्यायालयात धाव घेणार आहे.
डॉ. वाणीही असे ठरले अपात्र
डॉ.पाटील यांच्या नियुक्तीच्या विरोधात डॉ.वाणी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात न्यायालयाने डॉ.वाणी यांच्या बाजूने निर्णय दिला आहे. मात्र, यानिर्णयात डॉ.वाणी यांच्या मानधनावरील नियुक्ती चालू ठेवण्याच्या बाबतीतही कोणत्याही प्रकारचा आदेश नव्हता. त्यामुळे आयुक्त सोनवणे यांनी त्यांचीही सेवा समाप्त केली आहे.

पुन्हा कोर्टात याचिका दाखल करणार
^डॉ.पाटीलयांची सन २०१३ मध्ये कायम आस्थापनावर केलेली नियुक्ती चुकीची असल्यामुळे त्यांना दिले गेलेले सुमारे १७ लाख रुपये मानधन पालिकेने वसूल करावे किंवा चुकीची नियुक्ती करण्यात सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून वसूल करावे, अशी याचिका पुन्हा न्यायालयात दाखल करणार आहे. डॉ.सचिन वाणी, याचिकाकर्ते

कायदेशीर भरती नाही
महापालिकेने वैद्यकीय पदासाठी जाहिरात देऊन कायदेशीर भरतीच केली नसल्याचा मुद्दा या प्रकरणातून समोर आला आहे. डॉ.वाणी यांच्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयानेसुद्धा चुक दुरूस्त करून घ्यावी, असा उल्लेख केला आहे. वर्षापेक्षा जास्त काळ गेल्यावरही मनपाने दुरुस्ती केली नाही.
बातम्या आणखी आहेत...