आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील १५७ शिक्षक ठरणार अतिरिक्त, शिक्षक बदल्या पारदर्शी पद्धतीने करण्याच्या सूचना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात बदल्यांच्या प्रक्रियेस वेग आला अाहे. त्या अंतर्गत २९ एप्रिलपर्यंत समायोजन होणार असून, जिल्ह्यातील १५७ शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. मात्र, समायोजन करून त्यांना अन्यत्र नियुक्त्या दिल्या जाणार आहेत. दरम्यान, प्रशासकीय विनंती बदल्यांच्या प्रस्तावपात्र शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच बदल्यांची प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने पार पाडण्याच्या सूचना प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बैठकीत मंगळवारी दिल्या.

प्रस्ताव पात्र शिक्षकांच्या याद्यांवर ३० एप्रिलपर्यंत आक्षेप हरकती मागवण्यात येणार आहे. त्यानंतर मे रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होईल. बदली प्रक्रियेत प्रशासकीय, विनंती आपसी बदल्यांचे काम ते मेदरम्यान चालणार आहे. जिल्ह्यातील जि.प.शाळांमधील १५७ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यात अमळनेर १६, भडगाव २, भुसावळ ७, बोदवड ३, चाळीसगाव १८, चोपडा ४, धरणगाव ८, एरंडोल ३, जळगाव १०, जामनेर १८, मुक्ताईनगर ८, पाचोरा २१, पारोळा २१, रावेर १२ यावल असे शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. तसेच ६३ खासगी शाळांच्या संचमान्यतेतील त्रुटींच्या पडताळणीचे कामही पूर्ण झाले आहे. पुढील दोन दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. यासह ‘पेसा’अंतर्गत आदिवासी भागात तीन वर्षांपेक्षा अधिक काम केलेल्या शिक्षकांच्या विनंती बदल्या केल्या जाणार आहेत रिक्त जागा प्रशासकीय पद्धतीने भरल्या जातील. तसेच ७७ गावांमध्ये मार्च २०१५च्या अध्यादेशानुसार ही कार्यवाही केली जाईल.

दरम्यान, ‘ई-लर्निंग’अंतर्गत भुसावळ तालुक्यातील वराडसिम येथे ‘ई-लर्निंग’ उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी डी.पी.महाजन, गटशिक्षणाधिकारी विजय पवार अादी उपस्थित होते.

भडगावचा पदभार बहिरमांकडे
बदली प्रक्रियेदरम्यान बैठकांना अनुपस्थित राहत असलेले भडगावचे गटशिक्षणाधिकारी व्ही.आर.कुमावत यांना प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. त्यानंतर मंगळवारी त्यांचा पदभार विस्तार अधिकारी डी.एम. बहिरम यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.