चाळीसगाव - अंनिसचे प्रमुख डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला १६ महिने उलटूनही आरोपी मोकाटच आहेत. पुण्यातील घटनेचा तपास सीबीआय मुंबईत बसून करत आहे. आता सुप्रीम कोर्टानेच याची दखल घ्यावी, अशी अपेक्षा डाॅ. दाभोलकरांचे पुत्र डाॅ. हमीद यांनी व्यक्त केली. हत्याकांडाचा तपास लावण्याची मागणी करणारे आज सत्तेत आहेत. त्यांनी कठोर पावले उचलावीत. सीबीआयकडे तपास दिला, पण त्यांचा आमच्याशी संपर्क नाहीे. चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली असल्याचेही हमीद यांनी सांगितले.