आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यू राेखण्यासाठी केवळ १६ कर्मचारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - डेंग्यूने ग्रामीण भागानंतर अाता शहरात प्रवेश केला असून, जीवितहानी हाेऊ लागली अाहे. पालिकेच्या सर्वेक्षणात १६५ डेंग्यूसदृश रुग्ण असले तरी, खासगी रुग्णालयांतील अाकडे बरेच माेठे अाहे. डेंग्यू राेखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मलेरिया विभागात अाजमितीस १००पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची गरज असताना मात्र पाच लाख लाेकसंख्येेच्या शहराची जबाबदारी केवळ १६ कर्मचाऱ्यांवर साेपवण्यात अाली अाहे.

व्हायरल इन्फेक्शनसाेबत अाता डेंग्यूचे एनएस-१ पाॅझिटिव्ह रुग्ण निष्पन्न हाेऊ लागले अाहेत. अयाेध्यानगरपाठाेपाठ अाता शहरातील सर्वच भागांत तापाचे रुग्ण अाढळत अाहेत. महापालिकेच्या रविवारच्या अहवालातही नव्याने १६ डेंग्यूसदृश रुग्ण निदर्शनास अाले असून, शहरात तब्बल १८५ रुग्णांची नाेंद अाहे, तर १०९८ घरांची तपासणी करण्यात अाली. त्यात ७० घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या अाढळून अाल्या अाहेत, तर ११० दूषित साठे तपासणीत निष्पन्न झाले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी १६ ठिकाणचे साठे रिकामे करून रहिवाशांना सूचना केल्या. धाेका टाळण्यासाठी भवानीपेठ, शिव काॅलनी या भागात धुरळणी करण्यात अाली. मुक्ताईनगर भागातही दाेन संशयित अाढळून अाले. खंडेरावनगरातील अाझादनगर, शिवाजीनगरातील राधाकृष्णनगर, वाघनगर, नशेमन काॅलनी, नवीपेठेत सर्वेक्षण पूर्ण करण्यात अाले.

कर्मचाऱ्यांचा तुटवडा
शहरातसर्वेक्षणासाठी महापालिका अायुक्तांनी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली हाेती. १७ ते २१ सप्टेंबरदरम्यान सर्वेक्षण करण्यात अाले. त्यानंतर ते कर्मचारी पुन्हा अापल्या विभागात कार्यरत झाले. शहराची लाेकसंख्या पाच लाख असून, त्यादृष्टीने तपासणीसाठी किमान १०० कर्मचारी, १५ मुकादम, निरीक्षक असणे गरजेचे अाहे; परंतु सध्या पालिकेच्या मलेरिया विभागात २६ कर्मचारी असून, त्यातील १० कर्मचाऱ्यांना इतर कामे लावण्यात अाली अाहेत.त्यामुळे १६ कर्मचाऱ्यांवर एका निरीक्षकावर कामाची जबाबदारी अाली अाहे. एवढ्या माेठ्या शहराची जबाबदारी अत्यंत कमी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केली जात असल्याने पालिका प्रशासन अाराेग्याच्या विषयावर किती गंभीर अाहे? हे स्पष्ट हाेते.
मनपाची अाेम क्रिटिकलला नाेटीस : वाघनगरातील विशाल रवींद्र ठाकूर या तरुणाचा शनिवारी मृत्यू झाला. त्याला डेंग्यू पाॅझिटिव्ह असल्याचे अाेम क्रिटिकल केअर सेंटरतर्फे सांगण्यात अाले हाेते. त्यामुळे तरुणाच्या मृत्यूबाबत निश्चित कारणांची खात्री करता माहिती दिल्यामुळे महापालिकेने नाेटीस दिली अाहे.
ढिसाळ यंत्रणा
पालिकेच्याअाराेग्य विभागाने संशयित रुग्णांचे १७ नमुने अाैरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठवले अाहेत. याला अाता चार दिवस उलटले अाहेत. अद्यापही त्यांचा अहवाल अालेला नाही. त्यामुळे रुग्णावर उपचार कशाच्या अाधारे करायचा? असाही प्रश्न उपस्थित हाेत अाहे. चार ते पाच दिवस रक्ताचे अहवाल प्राप्त हाेत नसल्याने शासकीय यंत्रणांच्या ढिसाळ कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत अाहेत. पालिका प्रशासन एकीकडे डेंग्यूची लक्षणे असलेल्या रुग्णांचा मृत्यू हाेत असताना प्रभावी उपाययाेजना करता उलट उपचार करणाऱ्या डाॅक्टरांना नाेटीस देत असल्याने नाराजी व्यक्त हाेत अाहे.
बातम्या आणखी आहेत...