आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 173 Application Filled For Municipal Corporation Election

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव महापालिकेच्या निवडणूकीसाठी 173 अर्ज दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिका निवडणुकीसाठी सोमवारी 286 अर्ज विक्री झाले तर विद्यमान 21 नगरसेवकांसह 173 जणांनी अर्ज दाखल केले. त्याचप्रमाणे आजपर्यंत निवडणूक लढणार नाही म्हणणारे माजी महापौर व खान्देश विकास आघाडीचे नेते रमेश जैन यांनीही अर्ज खरेदी केला आहे. मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची झुंबड उडणार आहे. आजपर्यंत अर्ज दाखल न केलेल्या सर्वच राजकीय पक्षांतील दिग्गज अर्ज दाखल करणार असल्याने प्रशासनाची धांदल उडण्याची शक्यता आहे. त्याचा अनुभव सोमवारी सतरा मजली इमारतीत आलेल्या गर्दीने आला.

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची 13 ऑगस्ट ही शेवटची मुदत आहे. शेवटच्या दिवशी गोंधळ उडू नये म्हणून सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांनी सर्मथकांसह हजेरी लावली. यामुळे महापालिकेच्या परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. यात विद्यमान 21 नगरसेवकांनी पुन्हा भाग्य अजमावण्यासाठी अर्ज दाखल केले. यामुळे निवडणूक यंत्रणा व पोलिस प्रशासनावर प्रचंड ताण पडला. सतरा मजलीत उमेदवारांसोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे या कार्यकर्त्यांना शांत करण्यात पोलिसांची दमछाक झाली.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवारी महापालिकेत जत्रा भरली होती. त्यामुळे अधिकार्‍यांना भावी उमेदवार व कार्यकर्त्यांना रोखणे मुश्कील झाले होते.

अशी आहे स्थिती
रमेश जैन यांचा प्रभाग क्रमांक 21 ब साठी अर्ज
गेल्या काही दिवसांपासून खान्देश विकास आघाडीचे सूत्र हलविणारे व निवडणूक न लढवण्याचा विचार करणारे रमेश जैन यांनी प्रभाग क्रमांक 21 ब साठी दोन अर्ज खरेदी केले आहेत. त्याचप्रमाणे नरेंद्र भास्कर पाटील यांच्याविरोधात दंड थोपटल्यानंतर अचानक निवडणूक न लढवण्याचा पवित्रा जाहीर केलेले विष्णू भंगाळे यांनी प्रभाग 20 मध्ये निवडणूक न लढता प्रभाग 24 ब साठी चार अर्ज खरेदी केले आहेत. तसेच त्यांच्या पत्की संगीता विष्णू भंगाळे यांनी प्रभाग क्रमांक 34 ब मध्ये सर्वसाधारण सभेत निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. भोईटे कुटुंबातील नगरसेविका लता भोईटेंसह मुलगा व सुनेच्या नावाने अर्ज खरेदी केला आहे. हे सर्व दिग्गज मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. नरेंद्र पाटलांच्या विरोधात अद्याप एकच अर्ज दाखल आहे.

सोमवारी या दिग्गजांनी भरला अर्ज
खान्देश विकास आघाडीतर्फे गटनेते नितीन लढ्ढा, माजी महापौर सदाशिव ढेकळे, जयर्शी धांडे, प्रशांत पाटील, माजी उपमहापौर राखी सोनवणे, भारती कैलास सोनवणे, वर्षा खडके, ज्योती इंगळे, संगीता दांडेकर, हर्षा सांगोरे, अण्णा भापसे, सुभद्रा नाईक तसेच पाणीपुरवठा सभापती नितीन बरडे यांनी तर उपमहापौर मिलिंद कोंडू सपकाळे यांनी मनसेतर्फे अर्ज दाखल केला.