आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

176 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त, पालिका आरोग्‍य विभागाची कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरात प्लॅस्टिक पिशव्या विरोधात मोहीम तीव्र केली असून मंगळवारी पोलन पेठेमधील दोन दुकानदारांकडे प्लॅस्टिक पिशव्या आढळून आल्या. त्यांच्याकडून १७६ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त केला असून प्रत्येकी पाच हजार प्रमाणे १० हजाराचा दंड आकारण्यात आला आहे. 
 
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाला पोलन पेठेमधील श्रीराम प्लॅस्टिक शिव प्लॅस्टिक येथे प्लॅस्टिक पिशव्या चहाचे कप असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अभियंता भास्कर भोळे, प्रभाग अधिकारी सुशील साळुंखे, आरोग्य निरीक्षक शरद बडगुजर, एस. पी. अत्तरदे, ए. एन. नेमाडे, के. के. बडगुजर, अतिक्रमण अधीक्षक एच.एम. खान यांनी कारवाई केली. त्यामध्ये १७६ किलो प्लॅस्टिक पिशव्या चहाचे कप जप्त केले. दोन्ही दुकानदारांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला. 
बातम्या आणखी आहेत...