आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिम्का बुकसाठी १८ तासांत गायली जातील २५० गाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठी गायक पारिजात आणि गायत्री चव्हाण या दांपत्याने शनिवारी सायंकाळी वाजून ५६ मिनिटांनी गायनास सुरुवात केली. सलग १८ तास युगलगीत गायनाचा भारतात रेकॉर्ड करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. या १८ तासांत ते साधारणपणे २५० गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डच्या प्रतिनिधीतर्फे घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वेळेवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

शाहु नाट्यगृहा सायंकाळी सुरु झालेल्या कार्यक्रमात पोलिस अधीक्षक साहेबराव पाटील, महापौर जयश्री अहिरराव, अॅड.आय.जी.पाटील, राजू आप्पा शिनकर, नगरसेवक गणेश मोरे, श्याम वानखेडे, महेश घुगे, मोहन मोरे, शरद चौधरी, विनोद थोरात, वाहिदअली सय्यद उपस्थित होते. त्यानंतर बरोबर वाजून ५६ मिनिटांनी चव्हाण दांपत्याने ‘दो सितारों जमींपर है मिलन आज की रात...’ या गाण्याने सुरुवात केली. अशा प्रकारे एकामागे एक गीते म्हटली जात आहेत. ही गाणी कराओके या साउंड ट्रॅकवर गाण्यात येत आहेत. त्यामुळे व्यासपीठावर कोणतेही वाद्यवृंद नव्हते, केवळ गायक आहेत. तसेच या गायन कार्यक्रमाचे अखंडपणे शूटिंग करण्यात येत आहे. त्याकरिता कॅमेरे लावण्यात आले आहेत. हा रेकॉर्ड होण्यासाठी काटेकाेरपणे त्याची नोंद करण्यात येणार आहे. त्यात केवळ गाण्यांच्या वेळेची नोंद करण्यात येणार असून, दर तासानंतर पाच मिनिटांची विश्रांती घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दर पाच तासांनी वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. गाण्यांच्या वेळेची नोंद करण्यासाठी निरीक्षकांची िनयुक्ती करण्यात आली असून, चार तासांनी ते त्याची नोंद घेत आहेत.
त्याकरिता व्यासपीठावर मोठे इलेक्ट्राॅनिक घड्याळही ठेवण्यात आले आहे. संबंिधत निरीक्षक केवळ गायनाचीच वेळ नोंद करत असून, त्याचे १८ तास मोजण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम साधारणपणे बावीस ते तेवीस तास चालणार आहे. रविवारी दुपारी वाजेपर्यंत िवक्रमासाठी हा कार्यक्रम सुरू राहणार आहे.

- सतत १८ तास युगलगीत गायनाचा कार्यक्रम करून भारतात विक्रम करण्याचे निश्चित केले. त्यासाठी दोन महिन्यांपासून गायनाचा सराव सुरू हाेता. तसेच दररोज आठ तास सलग सराव केला. सन २०१३मध्ये ‘अजीब दास्तांॅ है’ हा कार्यक्रम सादर केल्यानंतर असा कार्यक्रम करण्याची प्रेरणा मिळाली. या अठरा तासांत ५० ते ८०च्या दशकातील चित्रपटांची गाणी सादर करण्यात येणार आहेत. पारिजातचव्हाण, गायक

प्रत्येक गाण्याची नोंद
लिम्काबुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी या कार्यक्रमाचे सलग शूटिंग करत आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक गाण्याची वेळही नोंदवत आहेत. सलग झालेल्या कार्यक्रमातून केवळ गायनाची वेळ मोजण्यात येणार आहे. युगलगीत गायनाचा हा पहिलाच कार्यक्रम असून, तो सलग १८ तास झाल्यास भारतात विक्रम ठरणार आहे. यापूर्वी युगुल गीत गायनात असा प्रयोग झालेला आहे. याची माहिती मिळविल्यानंतर चव्हाण दांपत्यानी रेकॉर्ड करण्यासाठी या कार्यक्रमाची निवड केली. त्यासाठी नियोजन केले. शहरात हा आगळा वेगळा कार्यक्रम ठरणार आहे. यापूर्वी प्रत्यक्षात कार्यक्रम झालेला नाही.
बातम्या आणखी आहेत...