आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाठ दिवसांत 18 ‘शिवशाही’ एसटी बस जळगावात येणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव विभागीय एसटी महामंडळाला येत्या आठ दिवसांत अत्याधुनिक १८ शिवशाही एसटी बसेस मिळणार आहेत. लांब पल्ल्याच्या अंतरासाठी या बसचा वापर होणार असून लवकरच महामंडळाकडून या बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 


एसटी महामंडळाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी शासनाकडून अतोनात प्रयत्न केले जात आहेत. पण ते प्रवाशांच्या पचनी पडत नसल्यामुळे महामंडळाला अपवाद वगळता तोटा सहन करावा लागतो आहे. त्यामुळे आहे ते प्रवासी टिकवून ठेवण्याची धडपड महामंडळाकडून सुरू आहे. त्यातच खासगी वाहनांची वाढती संख्या आणि त्यांच्याकडून प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधा महामंडळाकडून मिळत नाही अशी प्रवाशांची ओरड आहे. हा लक्षात घेता महामंडळाने शिवशाही अत्याधुनिक बस प्रवाशांच्या सुविधेसाठी आणण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठ दिवसात जळगाव विभागासाठी १८ शिवशाही बस मिळणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी पी.एन. घुले यांनी दिली. 


दरम्यान, जळगावसाठी सीटर बस असतील. याबाबत प्रशासकीय पातळीवर नियोजन झाले असून गावाच्या अंतरानुसार भाडे आकारणी होणार आहे. पण याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही,असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...