आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अमृत’ याेजनेंतर्गत पहिल्या टप्प्यातील १९ काेटी वितरित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - केंद्र शासनाच्या ‘अमृत’ याेजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात १२५ काेटींचा निधी मंजूर करण्यात अाला अाहे. त्यातील सुमारे १८ काेटी ७९ लाखांचा पहिला हप्ता महापालिकेला वितरित करण्यात अाला अाहे. हा निधी येत्या दाेन दिवसांत पालिकेच्या तिजाेरीत पडणार अाहे. तसेच याच याेजनेसंदर्भात पाच प्रस्तावांना येत्या महासभेत मंजुरी घेण्यात येणार अाहे.

नागरीकरणाचा वाढता वेग व्याप्ती विचारात घेता एक लाखापेक्षा जास्त लाेकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पायाभूत सुविधांचा स्तर उंचावण्यासाठी ‘अमृत’ याेजनेची अंमलबजावणी करण्यात येत अाहे. या याेजनेत जळगाव महापालिकेचाही समावेश झाला अाहे. पाणीपुरवठा, मलनि:सारण व्यवस्था- याकामी यांत्रिकी पद्धतीने मलवाहिन्यांची सफाई व्यवस्था, शहरी वाहतूक, पावसाच्या पाण्याचा निचरा हाेण्याची व्यवस्था, लहान मुलांसाठी उद्याने विकसित करणे अादी कामांचा या याेजनेत समावेश अाहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात पाणीपुरवठा, बगिचा ग्रीन स्पेसचा विकास साधला जाणार अाहे. त्यासाठी केंद्र राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम नुकतीच वितरित करण्यात अाली. त्यात पाणीपुरवठा याेजनेसाठी केंद्राकडून १२ काेटी ४३ लाख, तर राज्याकडून काेटी २१ लाख बगिच्यांसाठी केंद्राकडून १० लाख, राज्याकडून लाख मिळणार अाहेत. ही रक्कम लवकरच मनपाला मिळणार अाहे.

नळ जाेडणीवर जलमापक
‘अमृत’अंतर्गतपाणीपुरवठा याेजनेसाठी पाच प्रस्ताव तयार करण्यात येणार असून, या प्रस्तावांना १९ राेजी महासभेत मंजुरी घेतली जाणार अाहे. त्यात ‘अमृत’ याेजना मनपास मान्य अाहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा स्वहिस्सा मनपा वित्त अायाेगातून प्राप्त हाेणाऱ्या निधीसह इतर उत्पन्नातून करेल. त्यात ग्राहकांच्या नळजाेडणीवर जलमापक बसवण्यास मनपा तयार अाहे. याेजना पूर्ण झाल्यावर याेजनेचा खर्च त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नातून याेजना स्वयंसंतुलित करण्यासही मनपा तयार अाहे. ‘अमृत’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र राज्य शासनाने वेळाेवेळी निर्गमित केलेल्या किंवा करण्यात येणाऱ्या निर्णयानुसार या याेजनेची अंमलबजावणी करण्यासदेखील तयार असून, यावर महासभेत निर्णय घेतला जाणार अाहे. त्यासाठीचे प्रस्ताव तयार केले अाहेत.