आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीच लाख विद्यार्थ्यांचे काढणार ‘आधार’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - प्रत्येक शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड तयार करण्याची मोहीम शिक्षण विभागाने हाती घेतली आहे. या अंतर्गत पुढील दीड महिन्यात लाख ५७ हजार ५९७ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यात येणार आहे. शाळा सुरू होण्याआधी या विद्यार्थ्यांचे आधार कार्डचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यात जिल्हाभरातील शाळांतील प्रवेशित प्रत्येक बालकाचे आधार कार्ड तयार करून ते प्रवेश क्रमांकाशी जोडण्यात येणार आहे. २६ जूनपर्यंत हे अभियान राबवण्यात येणार आहे.

गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती शाळानिहाय गावनिहाय संकलित केली असून जिल्हास्तरावर एकत्रीकरण करण्यात आले आहे . त्यानुसार प्रत्येक शाळांमध्ये आधार कार्ड काढण्याचे काम सुरू होणार आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी आधार कार्डचा नंबर ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे आधारकर्ड काढणे आवश्यक झाले आहे. यासाठी पालकांनी यात पुढाकार घेऊन आधार कार्ड करून घ्यावे, असेही आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

७,१२,६४७ 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांची संख्या
४,५४,९५६ विद्यार्थ्यांजवळ आधार कार्ड
२,५७,५९७ विद्यार्थी आधार कार्डविना

आधार कार्ड नसलेले विद्यार्थी
- अमळनेर८५५५ - भडगाव ९६९५
- भुसावळ २२९६५ - बोदवड ५८७६
- चाळीसगाव ३६३७१ - चोपडा २२३१५
- धरणगाव १०६७३ - एरंडोल ११८६७
- जळगाव ७८८१ - जामनेर १८८५७
- मुक्ताईनगर १५३२४ - पाचोरा २३०३४
- पारोळा १३०४५ - रावेर १४०५४
- यावल १२३३२ - मनपा जळगाव २४७५३
अशी केली जाईल जनजागृती
मोहिमेंतर्गत शुक्रवार दि. 8 मे रोजी प्रत्येक गावातून प्रभातफेरी काढून आधार कार्ड नियोजनाचा प्रचार केला जाणार आहे. यासाठी गावकऱ्यांची बैठक घेऊन १०० टक्के बालकांचे आधार कार्ड तयार करण्याचा संकल्प करून प्रतिज्ञा देण्यात येणार आहे. यासंबंधीच्या सूचना प्राथमिकचे शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षकांना दिल्या आहेत. यात नागरिक, स्वयंसेवी संस्था, संघटना, पदाधिकाऱ्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.