आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यात व्यापाऱ्यावर हल्ला करून अडीच लाख लुटले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - देवपुरातील नगावबारी परिसरात असलेल्या कल्याणी बंगल्यामागे दबा धरून बसलेल्या सहा जणांनी व्यापाऱ्यावर काठीने हल्ला करीत त्यांच्याकडील अडीच लाख रुपयांची राेकड असलेली बॅग हिसकावून नेली. मंगळवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दुसरीकडे देवपुरातील पेट्राेल पंप ते नगावबारी परिसरात बुधवारी पहाटे चाेरट्यांनी धुडगूस घातला. काजू, बदाम खात, थंड पेय पीत चाेरट्यांनी चाळीस मिनिटांत पाच दुकाने फाेडली.

खासगी प्रवासी वाहतूक कंपनी चालवणारे कमलकांत सत्यप्रकाश गुप्ता (वय ५४) यांचे नगावबारी परिसरातील शिवाजी नगरात निवासस्थान अाहे. मंगळवारी रात्री दहा वाजता किराणा दुकान बंद करून ते दिवसभराच्या व्यवहाराचे पैसे अाणि दुकानातील ग्राहकांच्या उधारीच्या डायऱ्या, इतर कागदपत्र घेऊन माेटारसायकलने घरी जात हाेते. नगावबारी परिसरातील उड्डाणपुलाच्या बाजूला असलेल्या कल्याणी बंगल्याकडून शिवाजी नगरात जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी वळण घेतले. त्या वेळी त्या ठिकाणी अगाेदरपासून दबा धरून बसलेल्या चार ते पाच जणांनी त्यांच्यावर काठी दगडाने हल्ला केला. अचानक झालेल्या प्रकाराने ते गाेंधळून गेले. तसेच वाहनावरील नियंत्रण सुटून ते खाली पडले. या वेळी पाच ते सहा जणांनी त्यांच्या हातात असलेली काळ्या रंगाची बॅग हिसकावून नगावबारी मार्गे माेटरसायकलीवरून पळ काढला. या बॅगेत राेख लाख ३५ हजार रुपये अाणि ग्राहकांच्या उधारीच्या डायऱ्या, इतर कागदपत्रे हाेती. लुटारूंनी अचानक केलेल्या हल्ल्यात काठी त्यांच्या डाेक्यावर लागून दुखापत झाली तर डाव्या खांद्याखाली दगड लागल्याने त्या ठिकाणीही दुखापत झाली. लुटारू हे नगावबारीकडून पसार झाल्याने याबाबत साेनगीर पाेलिसांना कळवून नाकाबंदी लावण्यात अाली. मात्र, चाेरटे महामार्गावरील फाट्यावरून अाड रस्त्याने पसार झाल्याने नाकाबंदीत अशी काेणतीही व्यक्ती अाढळून अाली नाही. याबाबत कमलकांत गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवपूर पाेलिस ठाण्यात अज्ञात पाच ते सहा लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट चाैकशी
घटनेनंतर अप्पर पाेलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय अधिकारी हिंमत जाधव, स्थानिक गुन्हा शाखेचे पाेलिस निरीक्षक देविदास शेळके, देवपूरचे पाेलिस निरीक्षक के. बी. शिरसाठ अादींनी या ठिकाणी भेट देऊन चाैकशी केली. या ठिकाणी एक लहान नाला अाहे. तिथे फरशी तयार केली अाहे. तसेच काटेरी झाडेही अाहेत. त्याअाड लुटारू उभे हाेते. परिसरातील काही जणांनी त्यांना उभे असल्याचे पाहिले. मात्र, काेणीतरी गप्पा मारत असेल, म्हणून काेणाला संशय अाला नाही.

देवपुरातील दत्त मंदिर चाैकापासून काही अंतरावर असलेल्या पेट्राेल पंपाशेजारी असलेल्या तुळजाई प्राेव्हिजन, नवतेज बाजार, जीटीपी चाैकातील श्री मेडिकल तसेच नगावबारी परिसरातील चहाची टपरी अाणि एका हाॅटेलमध्ये चाेरट्यांनी चाेरी केली. नवतेज बाजारच्या शटरचे कुलूप ताेडून शटर वाकवत दहा ते पंधरा हजार रुपयांची राेख रक्कम चाेरून नेली. तुळजाई प्राेव्हिजनमधून ३० ते ३५ हजार रुपयांची राेकड चाेरून नेली. श्री मेडिकलमधून फ्रीजमध्ये असलेली फ्रुटी घेतली. तसेच चहा टपरीचे कुलूप ताेडून तीन ते चार हजारांचा मुद्देमाल चाेरून नेला.
बातम्या आणखी आहेत...