आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२९ वाळूचोरांना काेर्टाचा दणका; डंपरमालकांसह चालकांना शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अवैध वाळू वाहतूकप्रकरणी दाखल गुन्ह्यांतील २९ आरोपींना मंगळवारी न्यायालयाने शिक्षा सुनावली. यात डंपरमालकांसह चालक, मजुरांचाही समावेश आहे. आरोपींना सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. दरम्यान, शिक्षा झालेल्या अाराेपींची सायंकाळी उशिरापर्यंत न्यायालयात दंड भरण्यासाठी लगबग सुरू हाेती.
अजिंठा चाैफुलीवर वाळूची चाेरटी वाहतूक करताना डिसेंबर २०१२ राेजी एमअायडीसी पाेलिस ठाण्याच्या पथकाने दाेन डंपर (क्र. एमएच-१९/वाय-२१२२, एमएच-१९/झेड-४१२२) पकडले हाेते. याप्रकरणी सहायक पाेलिस उपनिरीक्षक बाळू दगडू पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपरमालक, चालक अाणि मजूर अशा २९ जणांवर वाळूचाेरीचा गुन्हा दाखल केला होता. मंगळवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात सुनावणी होऊन २९ जणांना शिक्षा सुनावली. या निकालामुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे.

यांच्यावरहाेता गुन्हा दाखल
डंपरमालक याेगेश घनश्याम फालक, देवचंद रतनपुरी गाेसावी (दाेन्ही रा. भुसावळ), डंपरचालक पुरुषाेत्तम लक्ष्मण काेळी, राजेंद्र दशरथ काेळी, मजूर लक्ष्मण बाबुराव काेळी, सचिन मधुकर काेळी, नितीन पुना काेळी, गणेश प्रेमचंद काेळी, जितेंद्रविठ्ठल काेळी, विनाेद अभिमन काेळी, बापू अभिमन काेळी, विकास सुरेश काेळी, समाधान मदन काेळी, प्रमाेद भागवत काेळी, अनिल सुरेश काेळी, किशाेर दिलीप काेळी, रवींद्र भागवत साेनवणे, गाेटूराम रामचंद्र काेळी, किरण रमेश पद्मे, अनिल अमृत घारे, संताेष श्रावण काेळी, परमेश्वर सुरेश सपकाळे, सुरेश रामचंद्र पाटील, उत्तम नथू काेळी, विजय प्रभाकर काेळी, निवृत्ती वामन साेनवणे, विनाेद मंगल सपकाळे, देविदास साेमा सपकाळे, एकनाथ उखर्डू काेळी यांच्यावर एमअायडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल हाेता. यातील काही अाराेपी यावल तालुक्यातील भाेरटेक येथील, तर काही वनाेली येथील अाहेत.
अपिलासाठी एक महिन्याची मुदत...
वाळूचाेरीप्रकरणी शिक्षा झालेल्या अाराेपींना सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली अाहे. मंगळवारी न्यायालयात अाराेपींची दंड भरण्यासाठी धावपळ सुरू हाेती.

अशी आहे शिक्षा
या खटल्यात सरकारतर्फे अॅड. राजेश गवई, अॅड. अनिल गायकवाड यांनी साक्षीदार तपासले. याप्रकरणी मंगळवारी न्यायाधीश पाटील यांनी डंपरमालक याेगेश फालक, देवचंद गाेसावी यांना अडीच वर्षे साधी कैद, १० हजार रुपये दंड अाणि दंड भरल्यास महिने कैदेची शिक्षा सुनावली. चालक पुरुषोत्तम काेळी, राजेंद्र काेळी यांना वर्षे कैद, हजार रुपये दंड अाणि दंड भरल्यास महिने कैदेची शिक्षा, तर २५ मजुरांना वर्ष साधी कैद, हजार रुपये दंड अाणि दंड भरल्यास महिने शिक्षा सुनावली. अाराेपींतर्फे अॅड. नितिन खैरनार यांनी काम पाहिले.
बातम्या आणखी आहेत...