आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय पोषण आहारावर तब्बल दोन कोटींचा खर्च

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार शिजवून देण्याचे काम विविध बचत गटांना देण्यात येते. या कामावर वर्षभराच्या कालावधीत एकट्या भुसावळ तालुक्यात तब्बल कोटी लाख रुपये खर्च झाला आहे.

शालेय विद्यार्थ्यांची रोडावत असलेली संख्या विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा, यासाठी जिल्हा परिषद, नगरपालिका, खासगी प्राथमिक माध्यमिक अशा तालुक्यांतील १५९ शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह सुटीत पोषण आहार दिला जातो. विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार पोषण आहार शिजवून देण्याचे काम गावातीलच बचत गटांना देण्यात आले आहे.

मात्र, बचत गटाच्या माध्यमातून शिजवून िदल्या जाणार्‍या आहाराचा दर्जा तो नेमका किती प्रमाणात वाटप होतो? याकडे दुर्लक्ष केले जाते. शिवाय बचत गटाच्या माध्यमातून दिल्या जाणार्‍या पोषण आहार वाटपावर कुणाचेही नियंत्रण नसते. काही ठिकाणी तर केवळ नावालाच आहार दिला जातो. पोषण आहार शिजवण्याची जास्तीची रक्कम मिळावी, यासाठी लाभार्थ्यांची संख्याही जास्त दाखवली जाते. हा प्रकार शिक्षण विभागाच्या डोळ्यात धूळ फेक करण्यासारखा असूनही दुर्लक्ष केले जाते.

दरम्यान, वर्षभराच्या कालावधीत तालुक्यातील शाळांमध्ये वाटप झालेल्या पोषण आहारावर शासनाचे तब्बल कोटी लाख रुपये खर्ची झाले आहेत. याशिवाय कुपोषित बालकांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी तालुक्यातील १८४ अंगणवाड्यांमध्ये ११५ बचत गटांच्या माध्यमातून सकस पोषण आहार वाटप केला जातो.

शालेय समितीला अधिकार
शाळांमध्ये पोषण आहार शिजवून देण्याचा ठेका कुणाला द्यायचा? याचे अधिकार शालेय व्यवस्थापन समितीला आहेत. त्यामुळे मर्जीतील बचत गटांना पोषण आहाराचा ठेका मिळत असल्याने समितीचे नियंत्रण राहत नाही. याबाबत प्रशानाने पुढाकार घेऊन पोषण आहार वितरणातील खाचखळगे वेळीच भरणे आवश्यक आहे. त्यामुळे पोषण आहार योजनेचा विद्यार्थ्यांना खरा लाभ मिळेल.

७० लाख लाभार्थी
तालुक्यातील १५९ शाळांमधील पहिली ते पाचवीच्या वर्गातील ४२ लाख ७२३ आणि सहावी ते आठवीच्या २८ लाख आठ हजार २८६ अशा एकूण ७० लाख हजार लाभार्थी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचा लाभ देण्यात आला आहे.

बिलानुसारच मिळते रक्कम
शाळेकडून सादर होणार्‍या बिलानुसारच वरिष्ठ पातळीवरून िबलाची रक्कम मंजूर होते. वर्षभराच्या कालावधीत कोटी लाख रुपयांचा खर्च पोषण आहार शिजवण्यावर झाला आहे आर.सी.बोकाडे,पोषण आहार अधीक्षक, भुसावळ