आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासगी काेचिंग क्लासच्या दाेघा संचालकांविरुद्ध गुन्हा, दाेन दिवसांची पाेलिस काेठडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - खासगी क्लासमध्ये मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचा मनस्ताप करून घेत बारावीतील उन्नती संजय महाले या विद्यार्थिनीने साेमवारी (दि.२७) शहरातील प्रमाेद नगरातील भाडेतत्त्वावर घेतलेल्या खाेलीत गळफास घेऊन अात्महत्या केली.

 

याप्रकरणी खासगी क्लासचालक नरेंद्र महाले, गिरीश साळुंखे या दाेघांविरुद्ध रात्री उशिरा पश्चिम देवपूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला. तसेच नरेंद्र महाले याला साेमवारी रात्रीच ताब्यात घेतले. त्याला मंगळवारी न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने त्याची दाेन दिवस पाेलिस काेठडीत रवानगी केली. गिरीश साळुंखे याला अद्याप अटक केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

 

शहरातील जयहिंद सीनिअर काॅलेजमध्ये बारावीचे शिक्षण घेणारी साक्री तालुक्यातील निजामपूर येथील उन्नती महाले ही प्रमाेदनगर परिसरात एका खासगी क्लासमध्ये जात होती. क्लासमधील शिक्षकाकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे तिने गळफास घेऊन अात्महत्या केल्याचा प्रकार साेमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस अाला. अात्महत्येपूर्वी तिने क्लासमधील वागणुकीबाबत शिक्षकांविषयी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या विषयीची माहिती उन्नतीच्या पालकांना मिळाल्याने त्यांनी दाेषींविरुद्ध गुन्हा दाखल करून संशयितांना अटक करावी, अशी मागणी करत उन्नतीचा मृतदेह ताब्यात घेण्याची भूमिका घेतली. त्यानंतर रात्री उशिरा उन्नतीचे वडील संजय वसंत महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खासगी काेचिंग क्लासचे संचालक गिरीश साळुंखे, नरेंद्र महाले यांच्याविरुद्ध पश्चिम देवपूर पाेलिस ठाण्यात अात्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भादंवि कलम ३०६ सह अनु.जा.ज. अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८७चे सुधारणा अधिनियम २०१५चे कलम ३(२)(५)४(अाय)(१)(अार) नुसार गुन्हा दाखल करण्यात अाला. याप्रकरणी नरेंद्र महाले याला साेमवारी रात्रीच अटक करण्यात अाली. त्याला मंगळवारी न्यायालयासमाेर उभे केले असता न्यायालयाने त्याची दाेन दिवस पाेलिस काेठडीत रवानगी केली. 


दरम्यान, गिरीश साळुंखे याला अद्याप अटक केलेली नाही. उपविभागीय पाेलिस अधिकारी हिंमत जाधव तपास करीत अाहेत. दरम्यान, मंगळवारी न्यायालयात खासगी काेचिंग क्लास संचालक उपस्थित हाेते. दिवसभर खासगी क्लासचे संचालक न्यायालयात हजर असल्याने शहरातील अनेक क्लासेस बंद हाेते. मात्र क्लासचालकांनी बंद केला नसल्याची माहिती देण्यात आली. याबाबत संघटनेची बैठक झाल्यानंतरच भूमिका स्पष्ट केली जाईल, अशी माहिती नाव छापण्याच्या अटीवर क्लास चालकांकडून देण्यात अाली. काेचिंग क्लासमध्ये मिळालेल्या शिक्षेचा अपमान सहन झाल्याने उन्नतीने अात्महत्या केल्याचे सांगण्यात येते. मात्र क्लासमधील इतरही विद्यार्थी, विद्यार्थिनींना उन्नतीबराेबर शिक्षा देण्यात अाल्याचे सांगितले जात अाहे. त्यामुळे केवळ उन्नतीला शिक्षा दिली असे नव्हते. तसेच काहींच्या म्हणण्यानुसार सध्या परीक्षा सुरू अाहे. त्या परीक्षेलाही उन्नती गैरहजर असल्याचे सांगितले जात अाहे. मात्र त्याला अधिकृत दुजाेरा मिळू शकला नाही. 

 

कुसुंबा येथे अंत्यसंस्कार 
याप्रकरणी पाेलिसांनी गुन्हा दाखल करून दाेषींविरुद्ध कारवाईचे अाश्वासन दिल्यानंतर रात्री उन्नतीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर रात्रीच कुसुंबा येथे तिच्यावर अंत्यसंस्कार झाले. 

बातम्या आणखी आहेत...