आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: चाेवीस तासांत दोन घरफोड्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दिवाळीच्या सुट्यांमध्ये सुरू झालेले चोऱ्या,घरफोड्यांचे सत्र कायम असून बुधवारी दिवसाढवळ्या आणि मंगळवारी मध्यरात्री घरफोड्यांच्या दोन घटना घडल्या. बुधवारी रणछोडनगरात एका बंगल्यात भरदुपारी घरफोड्यांनी धुमाकूळ घातला. संपूर्ण घराची झडती घेऊन केवळ एक-एक तोळ्याच्या दोन सोन्याच्या अंगठ्या हाती लागल्याने घरातील सामानाची तोडफोड करून चोरटे निघून गेले. तर तत्पूर्वी, मंगळवारी रात्री पिंप्राळा येथे कुटुंबीय पुढील घरामध्ये गाढ निद्राधीन असताना चोरट्यांनी मागील बाजूने घरात घुसून डल्ला मारला. विळ्याने कपाट फाेडून चाेरट्यांनी सुनेच्या बाळंतपणासाठी आणलेले पैसे, सोने लंपास केले. २४ तासांच्या आत दोन घरफोड्या झाल्यामुळे घबराट उडाली आहे.


फारसा एेवज हाती न लागल्याने महागड्या फर्निचरची तोडफोड
रणछोडनगरात बुधवारी दुपारी १.३० ते या वेळेत चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करीत घरातील १० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या. याशिवाय घरातील सुमारे एक लाख रुपयांच्या फर्निचरची तोडफोड केली आहे. घरफोडी करण्यापूर्वी चोरट्यांनी पद्धतशीरपणे रेकी केल्याचा संशय आहे. लक्ष्मण आनंद कळसकर यांचे दुमजली घर आहे. कळसकर हे मुंबई येथे नोटरी कार्यालयात नोकरीस आहेत, तर त्यांच्या पत्नी मीनाक्षी या सु.ग.देवकर शाळेत शिक्षिका आहेत. मुलगा अमित हा खासगी नोकरी करतो. बुधवारी कळसकर मुंबई येथे तर मीनाक्षी या शाळेत होत्या. दुपारी १.३० वाजता मुलगा अमित हा घराला कुलूप लावून महाविद्यालयात निघून गेला. त्यांनंतर तो 4 वाजता घरी परतला. दीड ते चार या अडीच तासांत चोरट्यांनी त्यांच्या घराचा किचनचा दरवाजा धक्का देऊन तोडला. त्यानंतर आतमध्ये हॉल, किचन बेडरुममधील सर्व सामान अस्ताव्यस्त केले.

 

चाेरटे सीसीटीव्हीत कैद
कळसकरयांच्या घरासमोर किरण खोंडे यांचा बंगला आहे. या बंगल्याच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. पोलिसांनी कॅमेऱ्यातील फुटेजची कसून तपासणी केली. या वेळी दोन चोरटे समोरच्या रस्त्यावरून संशयितरीत्या फिरत असल्याचे दिसून आले आहे. त्यांचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

सुनेच्या बाळंतपणासाठी अाणलेले २० हजार लांबवले
पिंप्राळा परिसरातील त्रिमूर्तीनगरमधील एका घरात चोरट्यांनी विळ्याच्या साहाय्याने कपाट फोडून २० हजार रुपये रोख ११ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चाेरट्यांनी लांबवलेले २० हजार रुपये हे बारी यांनी सुनेच्या बाळंतपणासाठी अाणून ठेवले हाेते.

 

११ ग्रॅमचे मंगळसूत्र चाेरी
बारीयांच्या घरातून चोरट्यांनी २० हजार रुपये लंपास केले अाहे. हे पैसे त्यांनी बाळंतपणाचे बिल भरण्यासाठी ठेवलेले होते. तसेच पॅन्टच्या खिशात ठेवलेले ११ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चाेरी झाले अाहे. बारी कुटुंबीयांनी घरफोडी झाल्याची माहिती पहाटेच रामानंदनगर पोलिसांना दिली होती. त्यानुसार पाेलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले चोरटे.

 

बातम्या आणखी आहेत...