आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2 Seat Election Of Jalgaon Municipal Corporation

मनपाच्या दोन जागांसाठी १८ जानेवारीला पोटनिवडणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - विधानसभा निवडणुकीत महापािलकेतील दाेन नगरसेवकविजयी झाल्याने त्यांनी नगरसेवक पदाचा राजीनामादिला अाहे. या दाेन्ही रिक्त जागांसाठी हाेणाऱ्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २३डिसेंबरपासूननिवडणुकीची प्रक्रिया सुरू हाेणार असून १८ जानेवारी राेजी मतदान हाेणार अाहे.
महापािलकेच्या प्रभाग क्रमांक १९ ‘अ’ मधील भाजपचे नगरसेवक सुरेश भाेळे प्रभाग क्रमांक ३४ ‘क’ मधील खान्देशविकास अाघाडीचे नगरसेवक प्रा.चंद्रकांत साेनवणे यांनी नुकत्याच झालेल्याविधानसभानिवडणुकीत उमेदवारी केली. त्यात ते दाेघेहीविजयी झाल्याने नगरसेवक पदाचा राजीनामा दिला हाेता. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून नगरसेवकांच्या दाेन जागा रिक्त हाेत्या. यासंदर्भातनिवडणुक अायाेगाकडून नुकताच कार्यक्रम प्राप्त झाला अाहे. त्यामुळे अाता भाजप खािवअाकडून अापापल्या जागा राखून अाणखी एक जागा वाढवण्याचा प्रयत्न हाेणार अाहे. यात मनसे राष्ट्रवादी भाजपसाेबत कायम राहते की उमेदवार उभे करेल हे महत्वाचे ठरणार अाहे. पोटनिवडणुकीसंदर्भात अायुक्तांनी २३ डिसेंबर राेजी अधिकृतरित्या कार्यक्रम जाहीर करण्याच्या सूचना देण्यात अाल्या अाहेत.
वॉर्ड क्रमांक १९ मध्ये भाजपतर्फे दिप्तीचिरमाडे, विशाल भोळे, राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. तर ३६ मध्ये माजी नगरसेवक प्रदीप रोटे यांना उमेदवारी मिळू शकते. या पोटनिवडणुकीत खाविआ, राष्ट्रवादी मनसेदेखील उमेदवार देणार असून अद्याप नावांबाबत कोणतीही चर्चा पक्षात सुरू नाही.