आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापूर : दहावीच्या दोन विद्यार्थ्यांचा गॅस टँकरखाली आल्याने जागीच मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवापूर : तालुक्यातील दुधवे येथील दहावीची परिक्षा देत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा रात्रीच्या एक वाजेच्या सुमारास गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील भडभुंजा फाट्याजवळील नागपूर-सुरत महामार्गावर अपघात झाला. या दोन्ही विद्यार्थ्यांचा गॅसटँकर खाली आल्याने जागीच मृत्यू झाला.

गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील उच्छल पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्रीच्या सुमारास आपल्या दुधवे गावाहून मित्रांबरोबर ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्यातील लक्कडकोट येथे आदिवासी समाजातील लोकप्रिय सोंगड्या पार्टी पाहण्यासाठी मोटरसायकल क्रमांक एम.एच.३९.०१९७ वर गेले होते. त्यादरम्यान भडभुंजा फाट्याजवळील नागपूर-सुरत महामार्गावर सुरतकडून धुळ्याकडे जात असलेल्या गॅसटँकर क्रमांक जी.जे.०६ ए.यु ६२५० भरधाव वेगात मोटरसायकली मागून धडक दिल्याने मोटरसायकल स्वार रोहित सुरेश नाईक (वय १६) ,युवराज रविंद्र वळवी (वय १६) दोन्ही रा दुधवे तालुका नवापूर यांच्या गॅसटँकर खाली येऊन डोक्याचा भाग चाकाखाली दाखला गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
 
गॅसटँकरने मोटरसायकली धडक दिल्याने गॅस टँकर दोन पटली मारून पलटला घटनास्थळावरून गॅसटँकर चालक फरार झाला असल्याची माहिती गुजरात मधील उच्छल पोलिसांनी दिली. यासंदर्भात उच्छल पोलिस ठाण्यात गॅसटँकरचालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा उच्छल सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डाॅ.विनायक गावित यांनी शवविच्छेदन करून प्रेत पालकांचा ताब्यात दिले.

दोन्ही परिवाराचे वंशाचे दिवे विजले
युवराज वळवीला वडील नाहीत फक्त आई आणि एक बहीण आहे.तर रोहितला भाऊ नाही एक बहीण आईवडील आहेत. या अपघातात दोन परिवाराचा वंशाचा दिवा विजले आहेत.नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. रूग्णालयात देखील नातेवाईकांचे प्रचंड गर्दी होती.

पालकांनी मुलांना मोटरसायकल देऊ नये
नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागात मुलगा नवीत गेला की मोटरसायकलीचा हट्ट करतो आणि काही वयाचा विचार न करता काही पालक मोटरसायकल घेऊन देतात.समज कमी असलेले मुले धुम स्टाईलने स्टंट्स बाजी करत ट्रिपल सीट वेळ आल्यावर चार सीट देखील मोटरसायकल वेगाने चालवतात.यावर पालकांनी नियंत्रण आणणे गरजेचे आहे. 

दुधवे गावात शोकाकुल वातावरण 
दुधवे गावात आदिवासी लोकांची होळीची जय्यत तयारी सुरू होती.परंतू मध्यरात्री गावातील दोन तरुणावर काळाने घाला घातल्याने होळी सणावर विर्जन आले.संपुर्ण गावात व परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले.दुपारी अंत्यसंस्कार प्रचंड गर्दी.
बातम्या आणखी आहेत...