धुळे- काेयल पेट्राेल पंपावर दराेडा घालन एकाचा खून करणाऱ्या दाेघा दराेडेखाेरांना न्यायालयाने चार दिवसांची पाेलिस काेठडी दिली. तिघांपैकी दाेघांना पाेलिसांनी रात्री मुक्ताईनगरहून शहरात अाणले. तिसरा साथीदार फरार अाहे. त्याचा शाेध घेण्यासाठी एक पथक रवाना झाले.
काेयल पेट्राेल पंपावर दराेडा घातल्यानंतर दराेडेखाेरांनी इस्माईल सय्यद यांची हत्या केली. या प्रकरणी पाेलिसांनी तातडीने दराेडेखाेरांची माहिती संकलित केली. त्यांचा शाेध घेण्यासाठी स्वतंत्र पथके रवाना केली. या पथकांपैकी एलसीबीचे पाेलिस निरीक्षक रमेश परदेशी यांच्या पथकाने मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथून फिराेज कावजी पवार (वय २४) अाणि महेंद्र कावजी पवार (२१) या दाेघांना ताब्यात घेतले. त्यांना रात्री शहरात अाणले. त्यांचा साथीदार असलेला राॅकी पवार हा पथकाच्या हातातून निसटला. दाेघांना साेमवारी न्यायालयात हजर केले. त्यांना चार दिवसांची (दि. २१ जुलैपर्यंत) पाेलिस काेठडी देण्यात अाली अाहे. अाराेपींना पकडण्यासाठी राबविण्यात अालेल्या माेहिमेची गुन्हेगारांची माहिती अप्पर पाेलिस अधीक्षक विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी डीवायएसपी अधिकारी हिंमत जाधव, साक्री डीवायएसपी नीलेश साेनवणे, एलसीबीचे निरीक्षक रमेशसिंग परदेशी, तालुका ठाण्याचे दिवाणसिंग वसावे उपस्थित हाेते. माेहीम यशस्वी करून अाराेपींना अटक करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अप्पर पाेलिस अधीक्षकांनी काैतुक केले अाहे.
पाेलिसांनी तांत्रिक मदतीच्या अाधारे अाराेपींना काही तासांत अटक करीत उत्कृष्ट कामगिरी केली अाहे. या कामगिरीबद्दल पाेलिस अधीक्षक एम. रामकुमार यांच्याकडून त्यांना राेख बक्षीस दिले जाणार अाहे. तर पाेलिस महासंचालकांनीही कामगिरी करणाऱ्या पाेलिस दलाचे काैतुक केले अाहे. त्यांच्याकडून प्रमाणपत्र देऊन गाैरवण्यात येणार असल्याची माहिती पाेलिस प्रशासनाकडून दिली गेली.
पाराेळा, चाळीसगाव, शहरातही गुन्हे दाखल
अटक करण्यात अालेल्या दाेघांच्या प्राथमिक चाैकशीतून त्यांनी चाळीसगाव येथील पेट्राेल पंपावर लूट, पाराेळा येथे ट्रकचाेरी अाणि काेयल पंपावर लूट, खून केल्याचे स्पष्ट हाेत अाहे. या तिन्ही गुन्ह्यांसंदर्भात पाेलिस काेठडीत त्यांची चाैकशी केली जाणार अाहे. याशिवाय साेनगीर येथील लुटीबाबतही संबंधितांकडे चाैकशी केली जाणार अाहे. याशिवाय अन्य काही गुन्हे संबंधितांनी केले असण्याची शक्यता असल्याने त्यादृृष्टीने पाेलिस तपास करीत अाहेत.
आरोपींची विशिष्ट पद्धत...
या घटनेतील अाराेपींची गुन्हा करण्याची पद्धत ही विशिष्ट टाेळीची हाेती. त्याबाबत एलसीबी, तालुका पाेलिस ठाण्याच्या निरीक्षकांनी माहिती प्राप्त केली. तसेच अाराेपींकडून गुन्ह्यापूर्वी रेकी केल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. सीसीटीव्ही बंद असताना दराेडेखाेरांचा शाेध घेण्याचे माेठे अाव्हान पाेलिसांसमाेर हाेते. मात्र सांघिक भावनेतून केलेल्या कामामुळे हे यश मिळाले अाहे.
- विवेक पानसरे, अप्पर पाेलिस अधीक्षक