आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टंचाईसाठी २० कोटींचा आराखडा, जळगाव जिल्ह्यासाठी अाॅक्टाेबर ते जूनपर्यंत वापरणार निधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगाव जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २० कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. ऑक्टोबर ते जून या कालावधीसाठी हा आराखडा आहे. पालकमंत्र्यांनी सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडून जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि त्याबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. गिरणा धरणावर अवलंबून असलेल्या चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, पारोळाया तालुक्यांत पाणीटंचाईला सुरुवात झालेली आहे. मात्र, इतर तालुक्यांमध्ये डिसेंबरनंतर पाणीटंचाई जाणवायला सुरुवात होईल. जिल्ह्यात जळगाव एक, अमळनेर दोन आणि पारोळा तालुक्यातील सहा गावे मिळून नऊ टँकर सुरू करण्यात आले आहेत. पाणी चोरणाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. एकही मजूर कामापासून वंचित राहणार नाही, याबाबत काळजी घ्यावी, असे निर्देशही खडसे यांनी दिले.

अधिकाऱ्यांवर कारवाई!
जिल्ह्यातीलपंधराही तालुके दुष्काळी आहेत. त्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्या. टंचाई उपाय योजनांचा चुकीचा अहवाल सादर करणाऱ्या तहसीलदार प्रांताधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा खडसे यांनी बैठकीत दिला.
बातम्या आणखी आहेत...