आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 20 गॅस ग्राहक प्रतीक्षेत, तरीही कनेक्शन नाही

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ: शहरातील दहा गॅस एजन्सीजकडे केवळ 20 ग्राहक नवीन कनेक्शन मिळण्यासाठी प्रतीक्षेत असल्याचे कागदोपत्री नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र नवीन कनेक्शन मिळविण्यासाठी ग्राहकांच्या नाकीनऊ येत आहेत. नवीन कनेक्शनसाठी एजंटच्या माध्यमातून सर्वसामान्य, नोकरदार वर्गाची आर्थिक लूट करणारे यात सक्रिय आहेत.
भुसावळ शहरातील एक लाख 87 हजार लोकसंख्येसाठी सात एजन्सीच्या माध्यमातून सिलिंडरचे वितरण आणि नवीन कनेक्शन देण्यात येते. यासह रेल्वे कर्मचारी आणि आयुध निर्माणी कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र गॅस एजन्सीज आहेत. आयुध निर्माणीत ऑर्डनन्स फॅक्टरी एम्प्लॉइज को-ऑप सोसायटीतर्फे गॅस एजन्सी चालविली जाते. यासह शहरातील आठ गॅस एजन्सीला नवीन कनेक्शनसाठी केवळ 20 ग्राहक अमित गॅस एजन्सीत प्रतीक्षा यादीवर असल्याचे सांगण्यात आले.
पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या सिलिंडर वितरणाबाबत कायम ओरड असते. काही मंडळी 21 दिवसांच्या अंतरानेच सिलिंडर मिळेल, असे सांगून ग्राहकांना पिटाळून लावतात. दुसरीकडे नवीन कनेक्शन लवकर मिळत नाही, अशा स्थितीत काही खासगी एजंट जास्तीचे पैसे घेवून सिलिंडर उपलब्ध करून देतात. यावर कारवाई गरजेची आहे. भारत गॅससाठी नियमाप्रमाणे एका सिलिंडरसाठी 4500 रुपये तर दोन सिलेंडरसाठी सहा हजार 500 रुपये आकारले जातात. तरीही ग्राहकाला सात हजार म्हणजेच दीड हजार रुपये मोजावे लागतात. हा प्रकार माहिती असूनही पुरवठा विभाग कारवाई करत नाही.
एचपी गॅसच्या वर्षा गॅस एजन्सीवरील सिलिंडर बुकींगसाठी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. ग्राहक कोणत्याही दूरध्वनी किंवा मोबाइलवरून 8888823456 या क्रमांकावर फोन लावून सिलिंडची नोंदणी करू शकतो. यामुळे ग्राहकांचा स्वत: येवून नोंदणीचा वेळ वाचण्यास मदत होणार असल्याचे वर्षा गॅस एजन्सीचे संचालक दीपक महाजन यांनी सांगितले.