आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा 20 लाख मतदार बजावणार आपला हक्क

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - येत्या 7 फेबु्रवारी रोजी होणा-या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मंगळवारी मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. या निवडणुकांत जिल्ह्यातील 20 लाख 24 हजार 38 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत.
जिल्हा प्रशासनाने विधानसभा निवडणुकांमधील याद्या प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागविल्या होत्या. दरम्यान, नवीन मतदार नोंदणी मोहीम राबवून नवीन मतदारांचा या याद्यांमध्ये समावेश केला आहे. मंगळवारपर्यंत 20 लाखांवर मतदारांची आकडेवारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. बुधवारी अंतिम यादी प्राप्त होईल. त्यात काही प्रमाणात मतदारसंख्येत वाढ होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनातर्फे वर्तविण्यात आली आहे. एकूणच नवीन वाढलेल्या मतदारांची संख्या ही आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांना पोषक ठरणार आहे. तर मातब्बर उमेदवारांना या वाढीचा फटकाही सहन करावा लागणार असल्याचे बोलले जात आहे.