आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटीसाठी जळगाव विभागात 20 हजार व्यापाऱ्यांची नोंदणी, विक्रीकर विभागाच्या मोहिमेस सुरुवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘वननेशन वन टॅक्स’नुसार देशात जुलै महिन्यापासून सर्व करांचा समावेश असलेला जीएसटी हा कर लागू करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केलेली आहे. त्यानुसार या कर प्रणालीसाठी व्यापाऱ्यांची नाव नोंदणी करण्यास विक्रीकर विभागातर्फे विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत जळगाव विभागात २० हजार २७३ व्यापाऱ्यांनी जीएसटीसाठी नाव नोंदणी केली आहे. 
 
देशभरात जुलैपासून जीएसटी टॅक्स लागू करण्यात येणार आहे. यामध्ये सद्य:स्थितीतील आयकर, मनोरंजन कर, केंद्रीय कर, उत्पादन शुल्क, सेवाकर आदी करांचा समावेश असणार आहे. या प्रत्येक विभागांकडून जीएसटीसाठी व्यापाऱ्यांची नाव नोंदणी करण्यात येणार आहे. वस्तू सेवा कायद्यांतर्गत व्यापाऱ्यांची नावनोंदणी प्रक्रिया विक्रीकर विभागामार्फत सुरू आहे. यापूर्वीच नोंदणीकृत असलेल्या व्यापाऱ्यांनी नवीन कायद्यांतर्गत नाव नाेंदणी करणे आवश्यक आहे. जळगाव विभागातील २४ हजार ८४२ व्यापाऱ्यांपैकी २० हजार २७३ व्यापाऱ्यांची नावनोंदणी केली आहे. उर्वरित हजार ५६९ व्यापाऱ्यांनी त्वरित नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
 
व्यापाऱ्यांनी नोंदणीसाठी येथे साधावा संपर्क 
जीएसटीसाठी नाव नोंदणी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी विक्रीकर सहआयुक्त कार्यालय, विक्रीकर अधिकारी बी. टी. बाविस्कर, सीए प्रशांत अग्रवाल यांचे कार्यालय जवाहर डेअरीच्यावर भुसावळ, विक्रीकर अधिकारी एस. एस. सूर्यवंशी, सीए एस. एस. धामणे यांचे कार्यालय, पहिला मजला कॅप्टन कॉर्नर चाळीसगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन विक्रीकर सहआयुक्त दीपक भंडारे यांनी केले आहे. 
 
नाव नोंदणीसाठी विशेष कक्ष 
नावनोंदणी केलेल्या व्यापाऱ्यांसाठी विशेष मदत कक्ष जळगाव, धुळे नंदुरबार येथील विक्रीकर कार्यालयांमध्ये सुरू करण्यात आले आहेत. या कक्षामार्फत व्यापाऱ्यांना नाव नोंदणीसाठी येणाऱ्या अडचणी दूर करणे, नाव नोंदणी प्रक्रियेसाठी मदत करणे आदी सुविधा पुरवण्यात येणार आहेत. २५ २६ फेब्रुवारी रोजी भुसावळ चाळीसगाव येथे विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...