आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 21 Governmental Holidays For Buraucracy In New Year

नवीन वर्षात चाकरमान्यांना 21 शासकीय सुट्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शासकीय कर्मचा-यांना कामाचे दिवस कमी असताना आगामी वर्षामध्ये त्यात भर पडली आहेत. त्यानुसार शासकीय कर्मचा-यांना 2014 मध्ये 21 सार्वजनिक सुट्या मिळणार आहेत.
2013 या वर्षात 18 शासकीय सुट्या होत्या. त्यातुलनेत 2014 मध्ये 21 सुट्या आल्या आहेत. त्यामुळे शासकीय, निमशासकीय कर्मचा-यांना नव्या वर्षात सुट्यांचा आनंद पूर्वीपेक्षा जास्त उपभोगता येणार आहे. एप्रिल महिन्यात दुसरा शनिवार, रविवार आणि सोमवारी 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवस लागून येत असल्याने शासकीय कर्मचा-यांना सलग तीन दिवस सुट्या मिळणार आहेत. ऑगस्ट महिन्यात पाच रविवार आणि स्वातंत्र्य दिन, पतेती आणि श्री गणेश चतुर्थी येत असल्यामुळे या महिन्यामध्ये तब्बल 8 दिवस सुट्या आल्या आहेत. त्याचप्रमाणे पुढील वर्षी दसरा आणि दिवाळी ऑक्टोबर महिन्यात येत आहे. या महिन्यातसुद्धा 7 दिवस सुट्या आल्या आहेत.
नक्षत्र आणि वाहन
तारीख नक्षत्र नक्षत्राचे वाहन
8 जून मृग हत्ती
22 जून आर्द्रा मोर
6 जुलै पुनर्वसू गाढव
20 जुलै पुष्य मेंढा
3 ऑगस्ट आश्लेषा उंदीर
16 ऑगस्ट मघा कोल्हा
30 ऑगस्ट पूर्वा मोर
13 सप्टेंबर उत्तरा घोडा
27 सप्टेंबर हस्त बेडूक
10 ऑक्टोबर चित्रा म्हैस