आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२१ लाखांच्या केमिकलची चाेरी, धुळे-साक्री रोडवरील नेर शिवारातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - रसायनाची वाहतूक करणाऱ्या टँकरचे सील तोडून त्यातून मिथेलिन केमिकलची चोरी करण्याचा प्रकार धुळे-साक्री रोडवरील नेर गावाच्या शिवारात उघडकीस आला. याबाबत तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत २१ लाख ४३ हजार २७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच पाच जणांना अटक केली आहे.

धुळे-साक्री रोडवरील नेर गावाच्या शिवारात असलेल्या हॉटेल वीरच्या पाठीमागे दोनशे मीटर अंतरावर असलेल्या पक्क्या घराच्या आडोशाला हा गोरखधंदा सुरू होता. त्याबाबत तालुका पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने काल शनिवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजेदरम्यान फौजफाट्यासह घटनास्थळी छापा टाकून ही कारवाई केली. त्या ठिकाणी पोलिसांनी जीजे ०१-डी.यू. १६६१ क्रमांकाच्या टँकरमधून केमिकल सील तोडून चोरण्यात येत होते. हे काम टँकरचालकासह अन्य लोकांच्या संगनमताने सुरू होते. कारवाईत मोठ्या प्रमाणावर ड्रम जप्त करण्यात आल्याने या ठिकाणी केमिकल उतरवण्याचा गैरव्यवसाय अनेक दिवसांपासून होत असल्याचा पाेलिसांना संशय आहे. अचानक पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामुळे आरोपी घटनास्थळी आढळून आले.

केमिकलचा व्यवसाय
नेरगावाच्या शिवारात अनेक वर्षांपासून गॅस टँकरमधून गॅसचोरीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालत होता. मात्र, पोलिसांनी कारवाई केल्यानंतर हा व्यवसाय बंद झाला. त्याच परिसरात आता केमिकल चोरीचा नवीन धंदा जोर पकडत असल्याचे तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर दिसून आले.

२१ लाखांचा माल जप्त
घटनास्थळावरूनकेमिकलचा टँकर, त्यात फायबरचे दोनशे लिटरचे दोन ड्रम केमिकल, ३५ लिटर क्षमतेचे ड्रम (३ भरलेले, रिकामे), दोनशे लिटरचे ४३ ड्रम, (४ भरलेले, अर्धवट ३७ रिकामे), २०० लिटरचे पत्री ड्रम (२ भरलेले, अर्धवट, रिकामे), तीन प्लास्टिक नळ्या, मोबाइल जप्त केले.