आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाेटिंग कमिटीस २३ प्रकरणांचे पुरावे देणार, अंजली दमानिया यांचे एकनाथ खडसेंना अाव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अापल्याविरुद्ध पुरावे नसताना राजीनामा द्यावा लागल्याचा दावा करणाऱ्या एकनाथ खडसे यांच्याविरुद्धची २३ प्रकरणे झाेटिंग कमिटीसमाेर मांडणार अाहे. परंतु अद्याप चाैकशी समितीचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे खडसेंनीच सांगावे मी कुणाकडे पुरावे द्यावे? असे खुले अाव्हान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिले.

जळगाव शहरातील मेहरूण शिवारातील जम्बाे ले- अाऊटसंदर्भात तक्रारींसंदर्भात माहिती घेण्यासाठी दमानिया बुधवारी शहरात अाल्या हाेत्या. महापालिकेतून त्यांनी जागांची संपूर्ण माहिती घेत यात काेणकाेणत्या राजकीय पदाधिकाऱ्यांचा संबंध दडलाय याचाही शाेध घेतला. काही कागदपत्रे ताब्यात घेतली. या वेळी पत्रकारांशी बाेलताना त्यांनी एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध केलेल्या अाराेपांमध्ये तथ्य असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट करत सरकारने नियुक्त केलेल्या झाेटिंग चाैकशी समिती समाेर २३ प्रकरणे सादर करणार असल्याचे सांगितले. याबाबत राज्यपालांची भेट घेतल्यानंतर विधानसभा विधान परिषद अध्यक्षांनाही पत्र लिहिले अाहे. खडसेंचे वरणगाव येथील प्लाॅटची विक्री त्यासाठी दाखवलेले भाव याचीही माहिती हाती अाली अाहे. खडसेंनी टेक्सटाइल कंपनी शारदा व्हेन्चर या कंपन्यांची स्थापना कशासाठी केली? याचाही शाेध घेत अाहे. खडसेंबाबत बरीच माहिती हाती अाली अाहे. परंतु देऊ कुणाला हा प्रश्न असे दमानिया यांनी सांगितले.

२०३ एकर जमीन कशी?
खडसेंकडे अामदार की शेती हे दाेन उद्याेग असताना त्यांच्या कुटुंबीयांनी २०३ एकर जमीन खरेदी कशी केली, यासाठी पैसा कुठून कसा अाला? याबाबतही माहिती चाैकशी समितीला देणार अाहे. त्यासाठी खडसेंनी निवडणूक अायाेगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीवर लक्ष केंद्रित केले अाहे.
बातम्या आणखी आहेत...