आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी संजीवनी योजना: 23 हजार शेतकऱ्यांना मिळेल 52 कोटी दंड, व्याज सवलत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - राज्य शासनाने थकित कृषी वीज ग्राहकांसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना लागू केली आहे. महावितरणच्या भुसावळ विभागातील २२ हजार ९४४ कृषी ग्राहकांकडे तब्बल १९० कोटी ७६ लाख ६० हजार ८५८ रुपयांची थकबाकी आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवल्यास सुमारे ५२ कोटी रुपयांची दंड व्याजाच्या रकमेची सुट मिळणार आहे. यामुळे आता या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 
 
महावितरण कंपनीने विभागातील थकीत कृषी ग्राहकांचा विजपुरवठा तोडण्याचे सत्र सुरु केले होते. मात्र सोमवारी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी थकीत कृषी ग्राहकांसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना जाहिर केली. या योजनेत थकबाकीदार शेतकऱ्यांना सहभाग नोंदवून मुळ थकबाकीवरील व्याज दंडाची रक्कमेत सवलत दिली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना गेल्या त्रैमासिकात आलेले चालूचे वीजबिल भरुन मार्च २०१७ पर्यंतची यापुढील थकबाकी प्रत्येकी तीन महिन्यांच्या सुलभ पाच हप्त्यात भरावी लागणार आहे. यासह चालू बिल भरणेही शेतकऱ्यांवर बंधनकारक राहिल. या योजनेत भुसावळ विभागातील तब्बल २२ हजार ९४४ कृषी वीज ग्राहक सहभाग नोंदवू शकतात. या सर्व शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतल्यास तब्बल ५२ कोटी रुपयांचे व्याज दंडाची रक्कम सवलतीच्या स्वरुपात मिळणार आहे. 

१५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ 
योजनेत२३ हजार थकीत वीज ग्राहकांपैकी किमान ९० टक्के थकीत ग्राहकांनी प्रतिसाद द्यावा, यासाठी भुसावळ विभागाचे कार्यकारी अभियंता एन. एम. माने यांनी विभागात शेतकऱ्यांची भेटी घेणे सुरु केले आहे. बुधवारी त्यांनी कुऱ्हा पानाचे शिंदी येथे भेट दिली. योजनेत सहभागासाठी चालू बिल भरण्यासाठी नोव्हेंबरची मुदत देण्यात आली होती. हा वेळ अल्प असल्याने आता १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतीत चालू वीजबिल भरुन उर्वरित मूळ थकबाकी (व्याज दंड वगळून) भरून सहभाग घेता येईल. 
 
स्वतंत्र याद्या तयार 
महावितरण कंपनीने ७.५ अश्वशक्तीच्या आतील कृषिपंप ७.५ अश्वशक्तीच्या वरील पंपांची स्वतंत्र थकबाकी यादी तयार केली आहे. १०० रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ग्राहकांचा यात समावेश करण्यात आला आहे. कृषी संजीवनी योजनेत शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढावा यासाठी महावितरणच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देवून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचून प्रबोधन करण्याचे काम सुरु आहे. 
बातम्या आणखी आहेत...