आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसबीआयमध्ये पैसे काढण्यासह भरण्याचीही 24 तास सुविधा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पैसे काढण्याच्या सुविधेसोबतच आता पैसे भरण्याची 24 तास सुविधा जळगावकर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी स्टेट बँकेत कॅश डिपॉझिट मशीन (सीडीएम) उपलब्ध होते. त्यामुळे बँकेत जाऊन पैसे भरण्यासाठी रांग लावण्याची गरज भासणार नाही.
भारतीय स्टेट बँकेत सीडीएमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, स्टेट बँकेची मुख्य शाखा, जिल्हापेठ शाखेत बँकेच्या कार्यालयीन वेळेत या मशीनचा वापर करता येत होता. परंतु बहुसंख्य ग्राहकांना याची माहिती नसल्यामुळे सीडीएमअसूनदेखील त्याचा फारसा वापर होत नव्हता. बरेच दिवस सीडीएमचा वापर कसा करायचा याचे प्रशिक्षण कर्मचार्‍यांना नव्हते. त्यामुळे ते मशीन पडून होते. रविवारपासून जिल्हापेठ शाखेत एटीएमसोबतच सीडीएमदेखील 24 तास ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिले आहे. रविवारी सुटीच्या दिवशीदेखील काही ग्राहकांनी या मशीनमधून पैसे भरले. पहिल्या दिवशी बँकेचे चीफ मॅनेजर एम.वाय. शेख यांनी ग्राहकांना मशीनविषयी मार्गदर्शन केले.
50 हजारांपर्यंत रक्कम भरता येणार
एका वेळी 200 नोटा आणि 50 हजार रुपयांपर्यंतची रक्कम भरता येणार आहे. ज्यापद्धतीने एकावेळी ठरावीक रक्कम काढल्यानंतर पुन्हा तेवढीच रक्कम काढू शकतात. तशी सुविधा पैसे भरण्यासाठीदेखील केली आहे. दिवसभरात एक लाखांपर्यंत रक्कम भरली जाणार आहे. प्रत्येक सीडीएमवर सुरक्षारक्षक व केअर टेकरची व्यवस्था करण्यात आली आहे.
व्यावसायिकांना फायदेशीर
व्यावसायिकांना पैसे भरण्यासाठी दुसर्‍या दिवसाची वाट पाहावी लागणार नसून रात्रीच पैसे भरता येणार आहेत. त्यासाठी पीओएस (पॉइंट ऑ स्टेट) हे मशीन स्टेट बँकेकडून ग्राहकांना विनामूल्य दिले जाणार आहे. त्यासाठी त्या व्यावसायिकाचे स्टेट बँकेत चालू खाते असणे गरजेचे आहे. या सुविधेचा ग्राहकांना चांगला लाभ मिळणार आहे.
ग्रीन चॅनल अंतर्गत ग्राहकांना सुविधा देण्याचा मानस
स्टेट बँकेने शहरवासीयांसाठी पहिले सीडीएम 24 तास उपलब्ध करून दिले आहे. आगामी काळात प्रत्येक एटीएमसोबत सीडीएमची सुविधा दिली जाईल. ग्रीन चॅनल अंतर्गत ग्राहकांना सुविधा देण्याचा मानस आहे. अतुल सावजी, उपप्रबंधक,

एटीएम स्टेट बँक
0 स्टेट बँक डेबिट कार्ड स्वाइप करा
0 ‘बँकिंग’ निवडा
0 भाषा निवडा
0 एटीएम पिन एंटर करा
0 डिपॉझिट निवडा
0 कॅश डिपॉझिट निवडा
0 बचत/चालू अकाउंट प्रकार निवडा
0 नोटा आत टाका आणि रक्कम निश्चित करा
0 रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली
0 पावती ताब्यात घ्या अन् तपासा