आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव : विद्यार्थिनीची सॅक चोरून एटीमएमने काढले 24 हजार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- परीक्षा देण्यासाठी दुसऱ्या महाविद्यालयात आलेल्या मुलीची परीक्षा दालनाबाहेर ठेवलेली सॅक चारून नेली. त्यातील एटीएम काढून तिच्या बँक खात्यातून २४ हजार ५०० रुपये परस्पर काढून घेतल्याची घटना शुक्रवारी घडली. 
 
गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील सारिका अंबादास यसंबरे (मूळ रा. संत कबीरभाई परिसर, हिंगणघाट) शुक्रवारी सकाळी १० वाजता मेहरूण परिसरातील इकरा महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी आली होती. पेपर सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सॅक परीक्षा दालनाच्या बाहेर ठेवण्यात आल्या होत्या. दुपारी १.३० वाजता पेपर सुटल्यानंतर तिची सॅक आढळून आली नाही. त्यात काही पुस्तके, एटीएमकार्ड, पर्स अशा वस्तू होत्या. दरम्यान, शनिवारी तिच्या एटीएम कार्डमधून २४ हजार ५०० रुपये विड्रॉल झाल्याचा मेसेज आला. या वेळी तिने बँकेत जाऊन चौकशी केली असता तिच्या एटीएमकार्डचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले. तिने एमआयडीसी पोलिसांना दिलेल्या माहितीवरून गुन्हा दाखल केला आहे. 
 
एटीएमवरच लिहला पिनकोड नंबर : सारिकाने आपल्या एटीएमवर चार अंकी पिनकोड लिहून ठेवला होता. त्यामुळे चोरट्यांना पैसे काढणे सहज सोपे झाले.