आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२४ हजार विद्यार्थ्यांनी मारली शाळेला दांडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- व्हॉट्सअॅप प्रणालीद्वारे शिक्षकांवर अंकुश ठेवण्याचा उपक्रम जिल्हा परिषद प्रशासनाने चार दिवसांपासून सुरू केला आहे. यात गैरहजर शिक्षकांवर कारवाईचे संकेतही देण्यात आले आहेत. मात्र, विद्यार्थी संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. जिल्हाभरातून घेतलेल्या पडताळणीत गुरुवारी सकाळ दुपार सत्रातून २३ हजार ७२३ विद्यार्थी गैरहजर असल्याचे आढळून आले आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांची उपस्थिती वाढवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अास्तिककुमार पांडेय यांनी ही प्रणाली सुरू केली आहे. चार दिवसांपासून सर्व तालुक्यातील बीईओंमार्फत शाळानिहाय माहिती मागवली जात आहे. यातून गैरहजर शिक्षकांचे प्रमाण जाणून घेतले जात आहे. या हजेरीपत्रकातून मात्र शिक्षकांपेक्षा विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण कित्येक पटीने जास्त असल्याचे समोर आले अाहे. तालुकानिहाय माहिती घेऊन सकाळ दुपार सत्रातील माहिती दरराेज अपडेट केली जात आहे. या प्रणालीस शिक्षकांमधून नापसंती दिली जात असली तरी हा उपक्रम सुरू ठेवण्याचा इशारा सीईओ पांडेय यांनी दिला आहे. यात शिक्षकांवर लक्ष केंद्रित केले जात असले तरी, विद्यार्थी संख्येकडे दुर्लक्षच होत आहे.

उपस्थिती वाढवा
दुपार सत्रात विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. गुणवत्ता वाढवण्यासाठी शाळेतील उपस्थिती वाढवणे आवश्यक आहे. याकडेही िजल्हा प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी पालकवर्गातून केली जात आहे.
शिक्षकांची उपस्थिती
स्थिती सत्र दुपार सत्र
एकूण शिक्षक ९४२ ६५०३
हजर शिक्षक ७७४ ५९१९
रजेवर असलेले शिक्षक ५० ४७६
प्रशिक्षणास गेलेले शिक्षक १०४ ८१
गैरहजर शिक्षक १०
उशिरा आलेले शिक्षक
गुरुवारची विद्यार्थी संख्या
स्थितीतीसकाळ सत्र दुपार सत्र
पटसंख्या ३० हजार ०६५ लाख ६२ हजार १७१
हजर २६ हजार ९९५ लाख ४१ हजार ५१८
गैरहजर ३०७० २० हजार ६५३
सध्यातरी शिक्षकांच्या हजेरीवर लक्ष
व्हाॅट‌्सअॅप प्रणालीमुळे प्रथमच जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण समोर आले आहे. आजवर ते समोर आले नव्हते. मात्र, हा प्रश्न गंभीर स्वरुपाचा आहे. यावर विवेचन करून उपाय केले जाणार आहेत. तूर्त शिक्षकांच्या हजेरीवर लक्ष केंद्रित केले जाईल. विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासह त्यांच्यावर ती जबाबदारीही देण्याचे नियोजन केले जाईल. तसेच विविध उपाययाेजना करून शाळेत विद्यार्थ्यांची हजेरी कशी वाढेल यावर जास्तीत जास्त लक्ष्य देण्यचा प्रयत्न अाहे. आस्तिककुमारपांडेय, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद