आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावेरमधील २५ एकर जमीन शासन जमा करण्याचे अादेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावेर - रावेर येथील किराणा व्यावसायिकाने शेतमजूर असल्याचा खोटा दाखला सादर करून अनेक ठिकाणी शेतजमिनी खरेदी केल्या अाहेत. हा प्रकार उघड झाल्यानंतर त्यांच्याकडून जवळपास दाेन काेटी किमतीची २५ एकर जमीन शासन जमा करण्याचे अादेश तहसीलदरांनी िदले आहेत.

रावेरातील अनिल कोटवाणी यांनी शेतमजूर असल्याचा बनावट दाखला सादर केला. त्या आधारे त्यांनी मुंजलवाडी, अटवाडे, तामसवाडी या ठिकाणी २९ जून २०१० ते जानेवारी २०१५ या काळात ९.९७ हेक्टर जमीन (जवळपास २५ एकर) खरेदी केली. राजकुमार खिरवडकर यांनी माहिती अधिकाराखाली उघड केली आहे. त्यामुळे तहसीलदार कुंदन हिरे यांनी तलाठ्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. कोटवाणी यांनी मुंजलवाडी शिवारात ३.५७ हेक्टर, अटवाडे शिवारात ४.५० हेक्टर, तामसवाडी शिवारात एकूण १.९० हेक्टर जमीन खरेदी केली होती.

शेतमजूर नाहीच
संबंधितव्यक्ती शेतमजुराच्या व्याख्येत येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र कुळवहिवाट शेत जमीन अधिनियम १९४८चे कलम ८४ ‘क’नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कुंदनहिरे, तहसीलदार,रावेर