आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेला ‘देव’ पावला; अखेर २५ कोटींचा निधी मंजूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - वर्षभरापासून २५ कोटींच्या निधीवरून सुरू असलेल्या राजकारणाला मंगळवारी पूर्णविराम मिळाला. दाेन दिवसांपूर्वी जामनेर दाैऱ्यावर अालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खाविअाच्या शिष्टमंडळाला दिलेला शब्द पूर्ण केला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने बहुचर्चित २५ कोटींचा निधी महापालिकेला मंजूर झाला अाहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांच्या कामाचा प्रश्न अाता मार्गी लागणार अाहे.
महापालिकेतील सत्ताधारी खाविअा विरोधक भाजपतील शीतयुद्धामुळे जळगाव दाैऱ्यावर अालेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी १९ जून २०१५ राेजी पालिकेला २५ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली हाेती. त्यानंतर ही घोषणाच राहत तब्बल वर्षभर काहीही हालचाल झाली नव्हती. निधी मिळवण्यावरून खाविअा भाजपात जोरदार राजकारण पेटले हाेते. यात भाजपचे नेते एकनाथ खडसे यांची भूमिका अातापर्यंत महत्त्वाची ठरल्याचे बाेलले जात अाहे. महापौर अामदार सुरेश भाेळे यांच्या संयुक्त बैठकीत २५ काेटींतून काेणती कामे करावी? यावर निर्णय घेण्यात अाला हाेता; परंतु ८४ कामांच्या यादीत भाजपच्या नगरसेवकांना स्थान नसल्याचा अाराेप करत भाजप नगरसेवकांनी नेत्यांकडे तक्रारींचा सपाटा सुरू केला हाेता. त्यानंतर हा निधी
२५ कोटींचा निधी मंजूर झाल्यानंतर महापालिकेत फटाक्यांची लळ लावून जोरदार आतषबाजी करण्यात आली.

प्रस्ताव सादर करणार
२५ कोटींसंदर्भात तब्बल १६ महिन्यांनंतर १४ अाॅक्टाेबर राेजी यासंदर्भातील आदेश काढण्यात अाले अाहेत. हे आदेश पालिकेस मंगळवारी प्राप्त झाले अाहेत. २५ कोटींसंदर्भात २९ सप्टेंबर २०१५ राेजी ठराव करण्यात अाला हाेता. तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाकडे सादर करण्यात अाला अाहे. अाता ताे प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्याचे निदर्शनास अाणून द्यावे लागणार अाहे.

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
^मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी विनंती मान्य करत मनपाला २५ कोटींचा निधी मंजूर करून माेठी मदत केली अाहे. यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केलेला पाठपुरावा महत्त्वाचा ठरला. अाभार व्यक्त करण्यासाठी अाम्ही मुंबईला जाणार अाहाेत. सकारात्मक घडामोडींमुळे हुडकाे व्यापारी संकुलांचा प्रश्न मार्गी लागेल. पुन्हा विकासाचे पर्व सुरू हाेईल. नितीन लढ्ढा, महापौर
बातम्या आणखी आहेत...