आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुष्ठरोगी शोधण्यासाठी रोज 25 घरांचे सर्वेक्षण, जिल्हा सामान्य रुग्णालयात अभियानाचा शुभारंभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ग्रामीण निवडक शहरी (झोपडपट्टी) भागातील कुष्ठरुग्ण शोधून त्यांच्यावर बहुविध उपचार करण्यात येणार आहे. यासाठी कृष्ठरुग्ण शोध अभियान राबविण्यात येत आहे. एक पुरुष एक स्त्री स्वयंसेवक १४ दिवस घरोघरी जावून सर्व्हेक्षण करणार आहे. सर्व्हेक्षणात सर्व व्यक्तींची शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात दररोज २० शहरी भागात २५ घरांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. 
 
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार बुधवारपासून राज्यातील २२ जिल्ह्यात २३४ तालुक्यात कुष्ठरोग शोध अभियान राबवण्यास सुरुवात झाली. या अभियानात जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात अभियानाचा शुभारंभ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. आर. पाटील, डॉ. संजय चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. अरविंद मोरे, जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य प्रणिता गायकवाड, डॉ. शेखर पाटील, कमलेश चव्हाण, विनोद पाटील यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचारी नर्सिंगचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभियानाच्या काळात आढळून आलेल्या सर्व संशयित कुष्ठरुग्णांची नोंद पथकाद्वारे घेण्यात येणार आहे. 

त्यांचे निश्चित निदान शासकीय, निमशासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत केले जाणार आहे. कुष्ठरोगाचे निश्चित निदान झालेल्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी घरोघरी येणाऱ्या पथकास सहकार्य करावे. घरातील सर्व व्यक्तींची स्त्री पुरुष आरोग्य स्वंयसेवकांकडून तपासणी करुन घ्यावी. अभियानात आढळून आलेल्या संशयित रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. डॉ. मोरे यांनी प्रास्ताविकात अभियानाचा उद्देश सांगितला. डॉ. शेखर पाटील यांनी आभार मानले. 
 
2 हजार ८१६ पथके तयार 
सर्व्हेक्षणातंर्गतगृहभेटीसाठी हजार ८१६ पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये ५९२ पर्यवेक्षकांचाही समावेश आहे. या पथकातील स्वयंसेवक पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले अाहे. पर्यवेक्षण जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून करण्यात येणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...