आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासनाच्या विभागांत बिलांवरून काथ्याकूट, जळगावातील पाणी परिषदेवर अाठ लाख खर्च

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून झालेल्या पाणी परिषदेसाठी अाठ लाख रुपये खर्च झाले हाेते. अाता हा खर्च काेणी करावा यावर जि. प. अाणि जिल्हा प्रशासनात काथ्याकूट सुरू अाहे. 

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जून राेजी पाणी परिषद स्वच्छ भारत अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून ही परिषद झाली. मात्र, याबाबत कोणतेही परिपत्रक शासनस्तरावर काढण्यात आलेले नाही. जिल्हा प्रशासनाला याबाबत लेखी स्वरूपात आदेश प्राप्त झालेले नव्हते. मात्र, अायाेजनाची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर हाेती. त्यामुळे हा खर्च कोणत्या लेखाशीर्षखाली दाखवायचा, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी या खर्चासाठी नियोजन समितीतून मोकळी वाट करून देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. 

स्वच्छ भारत अभियान कार्यशाळेच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेवर आर्थिक जबाबदारी देण्याचे नियोजन होते. मात्र, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील यांनी संपूर्ण खर्चाची जबाबदारी घेण्यास नकार दिला. केवळ भोजनाच्या खर्चाची जबाबदारी स्वीकारली आहे. परिषदेला उपस्थित सर्वांसाठी नाश्ता, सुग्रास भोजन, मिनरल वॉटर, मंडप, पथनाट्य संच, वक्त्यांचे मानधन, मंडप, विद्यापीठातील हॉलचे भाडे आदींवर सुमारे लाख रुपयांचा खर्च झालेला आहे.या रकमेची कोणत्या हेडखाली बिले द्यावी, याबाबत जिल्हा प्रशासनात काथ्याकूट सुरू आहे. या कार्यशाळेला जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह, जलसिंचन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. माधवराव चितळे, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, स्वच्छता दूत भारत पाटीलसह इतर मान्यवर उपस्थित हाेते. 

जेवणाचे बिल देणार 
जिल्हापरिषदेनेपाणी परिषदेत भाेजनावर झालेल्या खर्चाची जबाबदारी स्वीकारली आहे. १०० ते ११० रुपये थाळीप्रमाणे आलेला खर्च आम्ही देणार आहोत. मात्र, अद्याप बिले प्राप्त झालेली नाहीत. या परिषदेच्या खर्चाची जबाबदारी यंत्रणांना विभागून देण्यात येणार आहे. 
- राजन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी 

आम्ही नियोजन केले 
पाणी परिषद व्यवस्थितरीत्या पार पाडण्यासाठी नियोजनाची जबाबदारी असल्याने त्या अनुषंगाने माझा सहभाग होता. या परिषदेवर झालेल्या खर्चाबाबत माहिती नाही.
- अभिजितभांडे पाटील, उपजिल्हाधिकारी 
बातम्या आणखी आहेत...