आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात मागील वर्षाच्या तुलनेत पावसात 25% तूट, बाेदवडची पैसेवारी 50 पैशांवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव, भुसावळ - जळगाव जिल्ह्यात गेल्या दाेन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वार्षिक सरासरी शुक्रवारी ६३ टक्क्यांवर पाेहचली अाहे. गेल्या वर्षी १५ सप्टेंबरपर्यंत पावसाची वार्षिक सरासरी ८७.७ टक्क्यापर्यंत पाेहचली हाेती. यामुळे मागील वर्षांच्या तुलनेत १५ सप्टेंबरपर्यंत २४.४ टक्के तूट १५ सप्टेंबरपर्यंत दिसून येत अाहे. अाता परतीच्या पावसाकडून शंभरी गाठण्याची अपेक्षा व्यक्त हाेत अाहे. वार्षिक सरासरीच्या ५० टक्क्यांपर्यंतच रिमझिम बरसलेला पाऊस जिल्ह्यात थांबला हाेता. गणेशोत्सवात पावसाची टक्केवारी ४२ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत पाेहचली हाेती. गेल्या दाेन-तीन दिवसांत पावसाने ६३ टक्क्यांपर्यंत मजल मारली अाहे. 
 
दरम्यान, शुक्रवारी यंदाच्या पावसाळ्यात १५ सप्टेंबर राेजी प्रथमच दिवसभर वातावरणात धुके हाेते. ढगाळ वातावरण, अधून-मधून पावसाच्या सरींनी जळगाव शहरात हजेरी लावली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जाेरदार पाऊस झाला. 
 
अाजचा पाऊस : जळगाव२.६ मिमी, जामनेर १०.१ मिमी, एरंडाेल २.५ मिमी, यावल २५.९ मिमी, रावेर १९.६ मिमी, मुक्ताईनगर २२.३ मिमी, पाचाेरा ८.८ मिमी, बाेदवड ४२.७ मिमी, चाळीसगाव ४.४ मिमी, भुसावळ ३६.५ मिमी, पाराेळा ११.८ मिमी चाेपडा ३.४ मिमी. 

मुक्ताईनगर तालुक्यात वीज पडून ठार, चार जखमी 
परतीच्यापावसामुळे दाेन दिवसांमध्ये मुक्ताईनगर अाणि भुसावळ तालुक्यात माेठे नुकसान झाले. शुक्रवारी दुपारी मुक्ताईनगर तालुक्यातील धाबेपिंप्री येथे वीज पडून आसाराम देवसिंग भिलाला यांचा मृत्यू, तर भुसावळ तालुक्यातील कुऱ्हेपानाचे येथे टेकडीवरील पुरातन चौरंगीनाथ मंदिरावर वीज पडून चौघे जखमी झाले. मंदिराचेदेखील मोठेच नुकसान झाले आहे. विजेमुळे वेगवेगळ्या ठिकाणी २० जनावरे दगावली अाहेत. वेल्हाळे (ता.भुसावळ) येथे वीज पडल्यामुळे राेहित्राचा स्फाेट झाला अाहे. आसाराम देवसिंग भिलाला(रा.धाबे, ता.मुक्ताईनगर) हे शुक्रवारी दुपारी धाबेपिंप्री शिवारातील डोंगरावर गेले होते. 

या वेळी अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर जनावरांचा विजेमुळे मृत्यू झाला. मुक्तळ (ता.बाेदवड) येथे म्हैस पुरात वाहून गेल्यामुळे मृत्युमुखी पडली. भानखेडा येथे बकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झाला. वेल्हाळे (ता.भुसावळ) येथे बैल, म्हशी, एका शेळीचा मृत्यू झाला. कुऱ्हे अाणि जाेगलखाेरीत वीज पडून जण जखमी झाले अाहेत. मानपूर (ता.भुसावळ) येथे शुक्रवारी एका म्हशीचा वीज पडून मृत्यू झाला. तसेच १४ सप्टेंबर राेजी वेल्हाळे येथे वीज पडल्यामुळे राेहित्रचा स्फाेट झाला. भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा (पानाचे) येथे शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसापासून बचावासाठी चौघे टेकडीवरील पुरातन अशा चाैरंगीनाथ मंदिराच्या आडोशाला उभे होते. नेमके या वेळी मंदिरावर वीज पडल्याने चार जण जखमी छाले. देवचंद पंडित गांधेले (वय ६५), निवृत्ती बावस्कर (वय ६०), साेपान सुका वाघ (वय ३०) आणि मुकेश ठाकरे अशी त्यांची नावे अाहेत. 
 
पाराेळ्यातील ३५ गावे वगळता जिल्ह्यात इतरत्र ५० पैशांवर अाणेवारी 
खरिपातीलपीक स्थितीवर अाधारित नजर पैसेवारी प्रशासनातर्फे १५ सप्टेंबर राेजी जाहीर करण्यात अाली अाहे. यात पाराेळा तालुक्यातील ३५ गावे वगळता इतर सर्व तालुक्याची पैसेवारी ५० पैशांवर अाहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक पर्जन्यमान कमी असलेल्या बाेदवड तालुक्यातील सर्व ५१ गावांची पैसेवारी ५० पैशांच्यावर असल्याचे जाहीर करण्यात अाले अाहे. पावसाच्या सरासरीमध्ये सर्वाधिक ८० टक्के पर्जन्यमान झालेल्या पाराेळा तालुक्यातील ३५ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या अात असून सर्वाधिक कमी ४९ टक्के पर्जन्यमान असलेल्या मुक्ताईनगर, ५४ टक्के पर्जन्यमान असलेल्या बाेदवड तालुक्यातील एकाही गावाचा ५० पैशाच्या अातील पैसेवारीमध्ये समावेश नाही. पाराेळ्यातील ३५ गावे वगळता जिल्ह्यातील १५०१ गावांपैकी १४६७ गावांची पैसेवारी ५० पैशांवर असल्याचे जाहीर करण्यात अाले अाहे. ५० पैशांच्यावर असलेल्या तालुक्यातील गावांची संख्या जळगाव ९२, जामनेर १५२, एरंडाेल ६५, धरणगाव ८९, पाराेळा ७९, भुसावळ ५४, बाेदवड ५१, मुक्ताईनगर ८१, यावल ८४, रावेर १२१, पाचाेरा १२९, भडगाव ६३, अमळनेर १५४, चाेपडा ११७, चाळीसगाव तालुक्यातील सर्व १३६गावांची पैसेवारी ५० पैशांच्यावर असल्याचे जाहीर करण्यात अाले अाहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...