आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे गाड्या रद्द झाल्याने साडेचार हजार प्रवाशांना 26 लाखांचा परतावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- वाशिंद रेल्वेस्थानकाजवळ मंगळवारी (दि.२९) झालेल्या अपघातामुळे रेल्वे प्रशासनाला मोठा अार्थिक फटका बसला. विलंबाने धावणाऱ्या गाड्यांमुळे अनेक प्रवाशांना प्रवासाचे नियोजन पुढे ढकलावे लागले. २९ आणि ३० ऑगस्ट या दोन दिवसांत कन्फर्म तिकीट काढलेल्या भुसावळ विभागातील ४ हजार ४३१ प्रवाशांना रेल्वेने २६ लाख ७३ हजार ६७२ रुपयांचा परतावा दिला आहे. 
     
वाशिंदजवळ मंगळवारी सकाळी अपघात झाल्याने विभागातून धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचे मार्ग ऐनवेळी बदलण्यात आले. अपघाताला पाच दिवसांचा कालावधी झाल्यानंतरही गाड्या रद्द होण्याचे सत्र अद्यापही सुरूच आहे. शुक्रवारी याच पार्श्वभूमीवर ऐनवेळी पुष्पक एक्स्प्रेस भुसावळातून परत लखनऊला पाठवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. या प्रकारामुळे भुसावळ स्थानकावर अडीच तास गोंधळ झाला होता. अद्यापही अनेक रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलत असल्याने बहुतांश प्रवासी आरक्षित तिकिटे रद्द करत आहेत. त्यामुळे पहिल्या दाेन दिवसांत रेल्वेला माेठा आर्थिक फटका बसला. रेल्वे प्रशासनाने विभागातील मोठ्या स्थानकांवरील प्रत्येक तिकीट खिडकीवर तिकीट रद्द करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली हाेती. त्यामुळे तिकिटे रद्द करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टळली. तिकिटे रद्द करण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती. एेनवेळी गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना बसेसचा अाधार घ्यावा लागत अाहे. 
बातम्या आणखी आहेत...