आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत २६ संघांचा समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- भारतीय टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन अमॅच्युअर टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनतर्फे १६व्या राष्ट्रीय वरिष्ठ आणि वयस्कर गट पुरुष महिलांच्या टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेला रविवारी जिल्हा क्रीडा संकुलात सुरुवात झाली. त्यात भारतातील १६ राज्यांचे पुरुष संघ १० राज्यांचे महिला संघ सहभागी झाले आहेत.
पहिल्या दिवशी पुरुष गटातून महाराष्ट्र, पाँडेचेरी, केरळ, विदर्भ झारखंड यांनी विजयी घोडदौड करत साखळी फेरीतून बाद फेरीत प्रवेश केला. तसेच महिला गटातून उपांत्य फेरीत महाराष्ट्र विरुद्ध केरळ, पाँडेचेरी विरुद्ध हरियाणा, विदर्भ विरुद्ध हरियाणा मुंबई विरुद्ध आंध्र प्रदेश अशा लढती होणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन अप्पर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले. अध्यक्षस्थानी टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ.व्यंकटेश वांगवाड (पुणे) होते. या वेळी उमविचे क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील, धनराज सांखला (राजस्थान), राज्य सचिव खरे, बन्सी माळी, संजय चौधरी, संयोजक किशोर चौधरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मिलिंद केदार यांनी सूत्रसंचालन प्रशांत कोल्हे यांनी प्रास्ताविक केले.
बातम्या आणखी आहेत...