आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहिदांच्या अाठवणीने डाेळे पाणावले, २६/११ हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- युवाशक्ती फाउंडेशनतर्फे काव्यरत्नावली चौकात २६/११ हल्ल्यातील शहिदांना मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी अनेकांच्या डोळ्यांत शहिदांच्या आठवणीने पाणी आले होते.

रायसाेनी इंग्लिश मीडियम स्कूल : मुख्याध्यापिका नलिनी शर्मा मुख्याध्यापक विठ्ठल पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन करून डाॅ.अांबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात अाले. तसेच २६/११च्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात अाली. पूर्वा ताेष्णीवाल तृप्ती सिंग यांनी सूत्रसंचालन केले.

शेठ बी.एम.जैन विद्यालय : मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्यांना मेणबत्त्या प्रज्वलित करून श्रद्धांजली अर्पण करण्यात अाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक भास्कर फुलपगार हाेते. तसेच संविधान दिनानिमित्त डाॅ.अांबेडकर यांच्या प्रतिमेचेही पूजन करण्यात अाले. रवींद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर भारती साेनवणे यांनी अाभार मानले.

त्रिमूर्ती फाउंडेशनतर्फे शहिदांनामानवंदना देण्यात अाली. पाळधी पाेलिस स्टेशनमध्ये हा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून पाेलिस अधीक्षक डाॅ.जालिंदर सुपेकर, डीवायएसपी सदाशिव वाघमारे, फाउंडेशनचे अध्यक्ष मनाेज पाटील उपस्थित हाेते. फाउंडेशनतर्फे पाळधी पाेलिस स्टेशनला सीसीटीव्ही कॅमेरा भेट देण्यात अाला. तसेच सर्व पाेलिसमित्रांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात अाला. दिनेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर पीएसअाय डुमणे यांनी अाभार मानले.

प्राथमिकिवद्यामंदिरात झालेल्याश्रद्धांजली कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शहिदांवर कविता सादर केली. या वेळी मुख्याध्यापिका माया अंबटकर, प्रतिभा सूर्यवंशी, मुक्ता पाटील, कर्मचारी विद्यार्थी उपस्थित हाेते.

२६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना सामाजिक संस्थांतर्फे श्रद्धांजली
प्रतिनिधी | जळगाव
२६/११च्यामुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना गुरुवारी शहरातील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, राजकीय पक्ष सामाजिक संस्थांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात अाली. तसेच शहिदांना स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात अाला. या वेळी अनेकांचे डाेळे पाणावले हाेते.

पाेलिसअधीक्षक कार्यालयात कार्यक्रम
जिल्हापाेलिस अधीक्षक कार्यालयात गुरुवारी सकाळी ११ वाजता पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी अामदार सुरेश भाेळे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ.जालिंदर सुपेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अास्तिककुमार पाण्डेय, पाेलिस निरीक्षक श्याम तरवाडकर, चंद्रकांत सराेदे, दीपक लगड उपस्थित हाेते.

अार.अार.विद्यालयात मानवंदना
अार.अार.विद्यालयातमुंबई हल्ल्यात शहीद झालेले प्रमुख अधिकारी, १८ पाेलिस कर्मचारी लेफ्टनंट कर्नल संताेष महाडिक यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात अाली. संस्थेचे अध्यक्ष अरविंद लाठी यांनी शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. तसेच एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शहीद स्मारकास मानवंदना दिली. त्यानंतर ‘इतनी शक्ती हमें देना दाता’ ही प्रार्थना म्हटली. या वेळी अार.अार.विद्यालय, भा.का.लाठी विद्यामंदिर, न्यू इंग्लिश मीडियम स्कूलसह अार.अार.कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयातील सुमारे हजार विद्यार्थी, दिलीप लाठी, मुकुंद लाठी, अनिल लाठी, प्रा.वसंतराव साेनवणे, एम.के.कासट, प्रतिभा पाटील, मुख्याध्यापक डी.एस.सराेदे, जयप्रकाश लांबाेळे, पंकज कुलकर्णी अादी उपस्थित हाेते. बी.ए.पानपाटील यांनी सूत्रसंचालन केले.

येथेहीझाले कार्यक्रम : अलफैजहायस्कूल, रत्ना जैन प्राथमिक विद्यालय, ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय, काशीबाई उखाजी काेल्हे विद्यालय ज्युनियर काॅलेज.