आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

263 नागरिकांना डंेग्यूचा डंख: केवळ नऊ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा महापालिकेचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरात डेंग्यूने पाय पसरले आहेत. अगदी झोपडपट्टी भागापासून पॉश गणल्या जाणाऱ्या भागातही डेंग्यूच्या डंखाने लहान-थोरांना हैराण केले आहे. शहरात २६३ डेंग्यू संशयित रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये केवळ नऊ जणांना डेंग्यू झाल्याचा मनपाने दावा केला आहे. एवढी भयावह परिस्थिती असताना डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी मनपाच्या उपाययोजना कुचकामी ठरताहेत. तांबापुरासह शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्येही डेंग्यूची लक्षणे असलेली रुग्ण अाढळून येत असून वकील, ग.स.सोसायटीचे संचालक यांच्या घरांमध्येही रुग्ण आढळून आल्याचे मनपा अधिकाऱ्याने सांगितले. 

गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. वातारणात दमटपणा असून कमालीची उष्णता निर्माण झालेली आहे. त्यामुळे आजार बळावू लागले आहेत. सर्दी, ताप, खोकल्याचे घराघरात रुग्ण आहेत. त्याचबरोबर गेल्या दोन महिन्यात शहरात डेंग्यूने पाय पसरले आहेत. दिवसंेदिवस डेंग्यूची भयावह परिस्थिती निर्माण होत आहे. गेल्या महिन्यात १८८ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले होते. त्यामध्ये दिवसागणीक वाढच होतेय. शहरातील तांबापूरा झोपडपट्टी भागापासून सर्वत्र डेंग्यूने नागरिकांना हैराण केले आहे. डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आलेल्या भागामध्ये फवारणी, फाॅगिंग अॅबेटिंग करण्यात येत आहे. नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत असल्याचा दावा महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. मात्र, या सर्व उपाययोजना कुचकामी ठरत आहेत. महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार शहरात शुक्रवारपर्यंत २६३ डेंग्यू संशयित रुग्ण आढळून आले आहेत. 

वकील, ग.स.संचालक, उद्योजकांच्या घरातही डेंग्यू 
डेंग्यूबाबत विचारणा करण्यासाठी मनपाचे आरोग्य अधिकारी विकास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. पालिकेचा आरोग्य विभागाचा अर्धा पदभार देण्यात आलेले उदय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही शहरात डेंग्यूची भयावह परिस्थिती असल्याचे मान्य केले. त्यांनी तर डेंग्यू झालेले वकील, ग.स.सोसायटीचे संचालक अशी ते डेंग्यू रुग्णांची नावे सांगितली. त्यापैकी काही परिचितांचीही भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

खबरदारी घेत आहोत 
खबरदारीचा उपायम्हणून शहरातील अनेक भागांमध्ये दररोज फवारणी, फाॅगिंग अॅबेटिंग करण्यात येत आहे. तसेच डेंग्यूबाबत जनजागृतीचे कामही सुरू आहे. 
- डॉ.रामरावलानी, वैद्यकीय अधिकारी मनपा 

ही घ्या काळजी 
- डेंग्यूचाडास हा प्रामुख्याने स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. नागरिकांनी घरातील फ्रीज, कुलर, नारळाच्या कवटी, छतावरील टायर भंगार वस्तूमधील पाणी काढून स्वच्छ करावे. 
- भांड्यांमध्ये पाणी साचू देऊ नका. आपल्या परिसरातील खुल्या जागेत असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचते. त्या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून बुजवून टाकावा. 
- आठवड्यातून एक दिवस काेरडा दिवस पाळून घरातील सर्व भांडी रिकामी करून ठेवा. 
- डेंग्यूच्या डासाचा डंख होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी. अंगभर कपडे घालावेत. डास रोधक क्रीम हातापायाला लावावी. 
- डास घरात येऊ नयेत, यासाठी खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. 
बातम्या आणखी आहेत...