आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदूरबार जिल्ह्यात 112 कोटीची थकबाकी, 27 हजार शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्जमाफीच्या निर्णयानंतर आनंदोत्सव करताना भाजपचे पदाधिकारी. - Divya Marathi
कर्जमाफीच्या निर्णयानंतर आनंदोत्सव करताना भाजपचे पदाधिकारी.
नंदुरबार- जिल्ह्यात गेल्या सात वर्षांपासून २७ हजार ६४२ शेतकऱ्यांकडे ११२ कोटींची थकबाकी असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ झाल्याने जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील २७ हजार ६४२ सभासदांपैकी किती शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ होईल, हे राज्य शासनाच्या अंतिम निर्णयानंतर स्पष्ट होणार आहे.
 
दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यात येते. त्यानुसार सन २०१६-१७ या वर्षात जिल्ह्यातील १० हजार ४७३ सभासदांना ७० कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नंदुरबार तालुक्यातील १ हजार ६२५ सभासदांना ११ कोटी २८ लाख ८१ हजारांचे कर्ज १ एप्रिल ते १ जूनदरम्यान वाटप केले आहे. तत्पूर्वी ५ हजार ३१३ सभासदांनी २५ कोटी १३ लाख ३४ हजारांचे कर्ज थकवले आहे. त्यात ६० टक्के थकबाकीदार हे अल्पभूधारक असल्याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. कधी तरी पीककर्ज माफ होईल, या आशेने गेल्या सात वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांनी पीककर्जाची रक्कम भरलेली नाही. त्यामुळे थकबाकी थेट ११२ कोटी रुपयांवर गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू केले हाेते. या आंदोलनानंतर शासनाने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.  शासनाच्या निर्णयाचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.

अग्रणी बँकेत पूर्णवेळ अधिकारी हवा
पीककर्ज माफ केले असले तरी नवीन कर्ज देण्यासंदर्भात धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अजून कोणताही आदेश नाही. त्यामुळे नवीन कर्जवाटपास सुरुवात करण्यात आलेली नाही. जिल्हा अग्रणी बँकेत कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास अडचणी येतात. अग्रणी बँकेचा पदभार सध्या धामणकर यांच्याकडे आहे.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, थकीत पिककर्जाची माहिती...

 
 
बातम्या आणखी आहेत...