आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या हिशेबाने हुडकाेला २९ काेटींचे देणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - विकास कामांसाठी हुडकाेकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसंदर्भात महापालिकेने हुडकाे केंद्रीय नगरविकास मंत्रालयाला दाेन वेगवेगळे प्रस्ताव पाठवले अाहेत. यात २००४मध्ये झालेल्या कर्जाच्या रिसेटिंगनुसार ८.५० टक्के व्याजदराने २८ काेटी ९८ लाख तर हुडकाेच्या म्हणण्यानुसार ११.६० टक्के व्याजदराने ६८.०८ काेटी रक्कम पालिकेकडे घेणे असल्याचे म्हटले अाहे. शासनाच्या अादेशाचा संदर्भ देत हुडकाेचे अाता केवळ २८ काेटी ९८ लाख रुपये घेणे असल्याची अाग्रही भूमिका पालिकेने मांडली अाहे. त्यामुळे अाता केंद्रीयपातळीवरून काय निर्णय हाेताे, याकडे लक्ष लागून अाहे.

गेल्या महिन्यात राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांना पत्र पाठवून महापालिकेवरील हुडकाेच्या कर्जासंदर्भात मध्यस्थी करण्याची विनंती केली हाेती. पालिकेवर हुडकाेचे ६३० काेटींचे कर्ज अाहे. घेतलेले कर्ज केलेली परतफेड पाहता मुद्दल व्याजाची रक्कम जास्त असल्याचे म्हटले हाेते. त्यात डीअारटी काेर्टाने ३४० काेटींची डिक्री अाॅर्डर काढल्याचे म्हटले हाेते. यातून मार्ग काढण्यासाठी हुडकाे, महापालिका राज्य शासन यांची संयुक्तिक बैठक घेण्याची मागणी केली हाेती. त्यानंतर हुडकाे केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने पालिकेला पत्र पाठवून वस्तुनिष्ठ माहिती मागवली हाेती. त्याअनुषंगाने महापालिकेचे अायुक्त संजय कापडणीस यांनी शुक्रवारी दाेन्ही विभागांना पालिकेवरील कर्ज परतफेडीसंदर्भातील तसेच झालेल्या चर्चेनुसार माहिती कळवली अाहे.

नायडूंची भूमिका महत्त्वाची
महसूलमंत्रीखडसेंच्या पत्रानंतर केंद्रीय मंत्री नायडू यांनी दखल घेत महिनाभरातच पालिकेकडून माहिती मागवली अाहे. अाता पालिकेनेही वस्तुनिष्ठ अहवाल पाठवला अाहे. त्यामुळे कर्जफेडीबाबत लवकरच संयुक्तिक बैठक अायाेजित हाेण्याची शक्यता वर्तवली जात अाहे. नायडूंनी या प्रकरणात लक्ष घातल्यास ताेडगा निघणे सहज शक्य असल्याचे मत व्यक्त होत अाहे.

दाेन अाकड्यांचा उल्लेख
मनपानेहुडकाेकडून घरकूल वाघूर पाणी याेजनेसह विकासकामांसाठी १४१.३४ काेटींचे कर्ज घेतले हाेते. त्यानंतर २००४मध्ये हुडकाेसाेबत रिसेटिंग केली हाेती. त्यात ८.५ टक्के व्याजदरानुसार मनपाकडे १२९ काेटी ७६ लाख निघत हाेते. मनपाने २००४पासून अातापर्यंत १४३ काेटी ७४ लाखांची कर्जफेड केली. प्रतिवर्ष १३ काेटी सात लाख देणे अपेक्षित असताना मनपाने दाेन वर्षांपासून दरवर्षाला १४ काेटी अदा केले अाहेत. त्यामुळे २००४च्या रिसेटिंगप्रमाणे ८.५ च्या व्याजदराने केवळ २८ काेटी ९८ लाख घेणे असल्याचे म्हटले अाहे. तसेच हुडकाेच्या म्हणण्यानुसार जर ११.६० टक्के व्याजदराने अाकडेवारी काढली असता ६८ काेटी आठ लाख रुपये मनपाकडे घेणे असल्याचे प्रस्तावात म्हटले अाहे. परंतु, शासन निर्णय झालेल्या रिसेटिंगनुसार पालिकेकडे केवळ २८ काेटी ९८ लाख एवढेच घेणे असल्याची अाग्रही भूमिका पालिकेने मांडली अाहे.
बातम्या आणखी आहेत...