आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालच्या केंद्रातील २९ हरणे घेणार मोकळ्या जंगलात श्वास!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - मान्यतेअभावीशेवटच्या घटका मोजणाऱ्या तालुक्यातील पाल येथील हरीण पैदास केंद्रातील हरणांना लवकरच जंगलात मुक्त करण्यात येणार आहे. सखोल अभ्यासाअंती वनविभाग तज्ज्ञांसह पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने दीड ते दोन महिन्यात ही प्रक्रिया पूर्णत्वास येईल. शासनाची मान्यता आणि अनुदानच मिळत नसल्याने हरीण पैदास केंद्रातील वेगवेगळ्या प्रजातींच्या २९ हरणांच्या पालन-पोषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक सर्जन भगत (नागपूर) यांनी गेल्या पंधरवड्यात पाल येथे भेट देऊन तेथील हरणांना इतरत्र सोडण्याची सूचना केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

लौकिकात भर घालणारे केंद्र
कधीकाळीराज्यातील थंड हवेचे ठिकाण, असा लौकिक असलेल्या पालच्या सौंदर्यात इतर अनेक स्थळांसोबतच हरीण पैदास केंद्राने भर घातली होती. पालमध्ये येणारे पर्यटक अजूनही या केंद्राला आवर्जून भेट देतात. मात्र, येथील हरणांची केविलवाणी अवस्था पाहून त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीची छटा उमटते.

अनुदानाअभावी हरणांना दररोज सकस आहार देणे अशक्य झाले आहे. त्यामुळे स्थानिक अधिकारीच त्यांचे पालन-पोषण करतात. यामुळे वन्यजीव विभागाने त्यांना पुन्हा जंगलात
सोडण्याचा निर्णय घेतला.
प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी हरणांना योग्य ठिकाणी सोडावे, अशी सूचना केली आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांना कुठे मुक्त करायचे, याचे नियोजन करू.
एस.व्ही. रामाराव, वनसंरक्षक (वन्यजीव), नाशिक
बातम्या आणखी आहेत...