आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव : एकाच रात्री रुळांवर आढळले 3 मृतदेह, शिरसोलीतील रेल्वे लाइनवर 2 मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरेंद्र बाविस्कर,  योगेश बोरसे - Divya Marathi
नरेंद्र बाविस्कर, योगेश बोरसे
जळगाव - मित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी गेलेल्या कांचननगरातील १८ वर्षीय तरुणाचा मृतदेह शनिवारी पहाटे ३.३० वाजता प्रजापतनगरातील रेल्वे रुळावर आढळून आला. त्याच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहेे. नरेश राजेंद्र बाविस्कर असे मृत तरुणाचे नाव आहे. तसेच शहरात एकाच रात्रीतून वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांचा रेल्वेखाली मृत्यू झाल्याच्या घटना शनिवारी उघडकीस अाल्या. यातील दोघांची ओळख पटली अाहे. तर एक तरुणाची ओळख पटलेली नाही. त्याची ओळख पटवण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत. 
 
कांचननगरातील मृत्यूप्रकरणी घातपाताचा संशय
कांचननगरात राहणाऱ्या नरेंद्र बाविस्कर या युवकाचा मृतदेह प्रजापतनगर परिसरातून जाणाऱ्या डाऊन रेल्वे लाइनवरील खांब क्रमांक ४२१/१ ते ४२१/३३ दरम्यान शनिवारी पहाटे ३.३० वाजता आढळून आला. या घटनेमुळे कांचननगर परिसरात खळबळ उडाली . नरेश हा कांचननगरात आई माेठा भाऊ उमेश यांच्यासोबत राहत होता. सध्या तो शिक्षण घेत होता तसेच एका काचेच्या दुकानात काम देखील करीत होता. शुक्रवारी रात्री ८.३० वाजता नरेश मित्रांसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. रात्री १२ वाजता तो चित्रपट पाहून घरी आला. जेवण केल्यानंतर तो पुन्हा घराबाहेर पडला. गल्लीत मित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी तो बाहेर गेला होता. रात्री १.३० वाजेपर्यंत मित्रांसोबत बसलेला होता. त्यांनंतर सर्वजण घरी गेले. तर नरेश मात्र, घरी गेला नव्हता. त्यामुळे नरेशचा भाऊ उमेश काही नातेवाइकांनी रात्रीच त्याचा शोध सुरू केला. शोध घेणारे सर्वजण प्रजापतनगरातील रेल्वे रुळाकडे गेले असता, त्यांना मृतदेह आढळुन आला. तपासणी केली असता तो नरेशचाच मृतदेह असल्याचे आढळून आल्याने त्यांना धक्का बसला. पोलिसांच्या मदतीने मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी उपस्टेशन प्रबंधक एस.बी.सनस यांच्या खबरीवरून तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.
 
त्यानंतर पोलिस तपास करण्यात येणार असल्याचे आश्वासन कुटुंबीयांना दिले आहे. त्याच्या पश्चात आई, मोठा भाऊ, विवाहित बहिण असा परिवार आहे. नरेशची आई रंजूबाई ह्या अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात. दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 
पुढील स्लाइवडवर वाचा, शिरसोलीतील रेल्वे लाइनवर दोन मृत्यू... 
बातम्या आणखी आहेत...