आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणात बुडून तीन मुलांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील अंजनी येथील दुर्घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिद्धेश ठाकूर, रोहित ठाकूर व आकाश चौधरी - Divya Marathi
सिद्धेश ठाकूर, रोहित ठाकूर व आकाश चौधरी
एरंडोल  - जळगाव जिल्ह्यातील एरंडाेल येथील अंजनी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.  मृतांमध्ये दाेन सख्ख्या भावांचा समावेश आहे.   

सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सिद्धिकेश राहुल ठाकूर (वय १५), रोहित राहुल ठाकूर (वय १४), आकाश सुभाष चौधरी (वय १४) व श्याम संजय महाजन हे चौघे मित्र अंजनी धरणात पोहण्यासाठी गेले होते. या चाैघा मित्रांपैकी सिद्धिकेश ठाकूर, रोहित ठाकूर व आकाश चौधरी हे तिघे पोहण्यासाठी उगमाजवळील जलाशयात उतरले तर चौथा मित्र श्याम महाजन हा कपडे काढत हाेता. त्याच वेळी पाण्यात उतरलेले तिघे बुडत असल्याचे त्याच्या लक्षात अाहे. तिघेही एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, प्रयत्न अपुरे पडल्याने  तिघांचा बुडून मृत्यू झाला. श्यामने अॅड. नितीन चौधरी यांना मोबाइलवरून तिघे बुडत असल्याची माहिती दिली.    
 
तरुणांनी बाहेर काढले मृतदेह : 
ही बातमी गावात कळताच नागरिकांनी धरणाकडे धाव घेतली. पळासदड, धारागीर व खडकेसिम येथील दीपक भिका पवार, संजय पंजू पवार, रवींद्र धना ठाकरे, बाळू सुकलाल ठाकरे, हरी श्यामसिंग जोगी या तरुणांनी तिघांचे मृतदेह बाहेर काढले. मृतदेह बाहेर काढण्यासाठी गेलेल्या तरुणांनाही मार लागून पोटाला, छातीला जखमा झाल्या होत्या.   
 
मृतांत दोघे सख्खे भाऊ
या दुर्घटनेत मृत झालेले सिद्धिकेश व रोहित ठाकूर हे दोघे सख्खे भाऊ असून त्यांच्या पश्चात आई-वडील व लहान भाऊ असा परिवार आहे. तर आकाश चौधरी हा आजी, आजोबांकडे राहत होता. त्याचे आई-वडील शिरपूर येथे राहतात. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.
 
हे पण वाचा.. 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...