आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खराब रस्त्यांसाठी 3 काेटींचा प्रस्ताव रवाना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मनपाने तयार केलेला प्रस्ताव विभागीय अायुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात अाला अाहे. विशेष रस्ते अनुदानाच्या तीन काेटींच्या निधीतून काही महत्त्वाच्या रस्त्यांवर खर्च करण्यात येणार असल्याची माहिती सभापती नितीन बरडे यांनी दिली. यात कालिंकामाता मंदिर रस्त्यासह खाेटेनगर, भिकमचंदनगर नवीपेठेतील रस्त्यांचाही त्यात समावेश अाहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव विभागीय अायुक्तांच्या मान्यतेसाठी पाठवण्यात अाला अाहे. तसेच भाजपचे नगरसेवक डाॅ. अश्विन साेनवणे यांच्या प्रभागातील विजय काॅलनी, विष्णुनगर, चंद्रप्रभा काॅलनी, गणगाेपी अपार्टमेंट अादी भागातील रस्त्यांच्या २४ लाखांच्या कामांची निविदा प्रक्रिया अाठवडाभरात राबवण्यात येणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...