आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूल दत्तक देण्यासाठी 3 लाख रुपये घेतो!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - टाटिया शिशुगृहातून बाळ दत्तक देण्यासाठी लाखो रुपयांचे डोनेशन घेतले जात असल्याचे समोर आले असून शिशुगृह चालवणाऱ्या महाराष्ट्र मारवाडी फाउंडेशनचे सचिव वीरेंद्र धोका आणि बाळ दत्तक घेण्यास आतुर असलेले जळगावचे वकील नथ्थू पाटील यांच्यातील संवादाची खळबळजनक व्हिडिओ क्लिप ‘दिव्य मराठी’च्या हाती लागली आहे. राज्यभरातील तीन शिशुगृहे चालवण्यासाठी दरमहा साडेसहा लाख रुपये खर्च येतो, तो कुठून भागवणार? असा उलट सवालही धोका यांनी या क्लिपमध्ये केला आहे. त्याचबरोबर फाउंडेशन संचलित जालना, जळगाव आणि परळीच्या शिशुगृहातून आतापर्यंत ३७० अनाथ मुलांना दत्तक देण्यात आल्याची कबुलीही त्यांनी या संभाषणात दिली आहे. त्यामुळे विनाअनुदानित शिशुगृह चालवताना अपत्यहीन दांपत्यांकडून ही संस्था लाखो रुपयांची देणगी वसूल करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
धोका आणि अॅड. पाटील यांच्यातील संभाषणाची ही व्हिडिओ क्लिप १८ एप्रिल २०१६ची आहे. जिल्हा न्यायालयासमोरील दोन वडापावची दुकाने आहेत. त्या दोन दुकानांमधील गल्लीत ही भेट झाली. त्या वेळी शिशुगृहाचे तत्कालीन व्यवस्थापक हरीश अंबुरेही हजर होता. बाळ दत्तक घेण्याच्या प्रक्रियेविषयी संशय आल्यामुळे अॅड. पाटील यांनी आपला मित्र अॅड. वाय.एस.पाटील यास सोबत घेतले. त्याने हे शुटींग केले. संभाषणावेळी ही क्लिप घेतल्याने कॅमेरा सतत हलताना दिसतो. धोका हे थोड्या-थोड्यावेळाने समोर येतात. कोर्ट चौकातील वाहतूक, न्यायालयाची इमारतही दिसते. ही व्हिडिओ क्लिप सुमारे २० मिनिटांची आहे.
व्हिडिओ क्लिपधील धोका अॅड. पाटील यांचा संवादातील मुख्य अंश

अॅड. पाटील : कायचाललय?
धोका: बोलावकील साहेब, काय आदेश आहे.
अॅड.पाटील : आमचाकाही आदेश नाही, बाळ हवं होतं.
धोका: हेकाम केल्यास गिरीश महाजन संस्था बंद करण्याची धमकी देत आहेत. काँग्रेसच्या राज्यात आम्ही भाजप कार्यकर्ते होते. त्या वेळेस आम्ही काँग्रेसवाल्यांना घाबरलो नाहीत. आमदार जयप्रकाश मुंदडा, अभय बंग आणि मी आदी भाजपचे लोक या संस्थेचे विश्वस्त आहोत. भाजपवाले भाजपची संस्था कशी बंद करणार? आमचे जालना, परळी आणि जळगाव येथे शिशुगृह आहेत. जालना शिशुगृह अनुदानित इतर दोन विना अनुदानित आहेत. आतापर्यंत ३७० मुले दत्तक दिली आहेत. सहा :सात मुलांचा अपवाद वगळता एका मुलाचे आम्ही तीन लाख रुपये घेतो. गरीब हातगाडीवाल्यांनाही आम्ही मुले दिलेली आहेत. त्यांच्याकडून काय डोनेशन घेणार? शासकीय अनुदानाची आम्हाला गरज नसल्याचे शासनाला आम्ही लिहून दिले आहे. काम झाल्यानंतर कुणी नमस्कार करीत नाही. मुंदडा, बंग आणि मला काय कमी आहे. डोनेशनचा वापर अनाथ मुलांसाठीच करणार आहोत. तीन लाख रुपयांची आम्ही पावती देतो. महाजनांच्या मित्राकडून तीन लाख रुपये घेतले, त्यामुळे मी घाबरत नाही. सार्वजनिक ठिकाणी बोलतोय. मुलगी घेतल्यास आम्ही समजू शकतो. मुलगी घेतल्यास तुम्ही दोन घरांचे भले करता. मुलगा घेत असाल तर कुलदीपक घेत आहात.
धोका: तुम्हीवैद्यकीय खर्च किती केला?
अॅड.पाटील : वैद्यकीयउपचार केले. डॉक्टर म्हणाले उपचार सुरू ठेवा. त्याचा उपयोग नसल्याने उपचार बंद केला.
धोका: खोटेबोलताय तुम्ही. वैद्यकीय उपचारासाठी १० ते १५ लाख खर्च लागतो. जळगाव रेल्वेस्थानकावर फिरणाऱ्या मुलीला कॅनडाला दत्तक दिले. त्या व्यक्तीने मला अपेक्षेपेक्षा तीनपट अधिक दिले. सर्वांना देखणा मुलगा हवा आहे. काळ्या मुलांना कुणी पसंत करीत नाही. तीन महिन्यांपासून तुमच्याशी चर्चा करतोय. प्रॅक्टिकल लाइफ जगणारा व्यक्ती आहे. पाप पुण्याला घाबरतो. एवढ्या दिवसात दीदींच्या हातात मुलगा खेळायला हवा होता. दररोजच्या ताणापासून मुक्ती मिळाली असती.
अॅड.पाटील : गोरामुलगा हवा, हा ज्याच्या-त्याच्या आवडीचा प्रश्न आहे.
धोका : मुंदडाजींच्याबंगल्यावर या... पैसे कमी करण्याचा त्यांना अधिकार आहे.
तीन ते चार मिनिटे कुणीच कोणाशी बोलत नाही.
अॅड.पाटील : विशालकडूनअशी अपेक्षा नव्हती?
धोका: मुंदडाजींनीसांगितल्यास ११ हजार रुपयांची पावती फाडू. सुप्रिमो कोण? डॉक्टर्स, पोलिसवाले सर्व दुकान लावून बसले आहेत. जळगाव येथे माझी संस्था आठ वर्षांपासून आहे. मी येथे देणगी घेत नाही. त्यामुळे तुम्ही तीन लाख द्या. तुमच्या जिल्ह्यातील मुलांचा रेशो २० ते ३० होता. येथे आमची संस्था नव्हती. त्यावेळेस महिन्याला सहा मुले येत होती. शिशुगृह नव्हते तेव्हा किती रेशो होता. दर दिवशी एक मुलगा मी घेऊन जात होतो. संस्था जळगावला सुरू झाल्यानंतर तो आकडा सहावरून तीनवर आला. सोळा तहसीलमध्ये महिन्याला १६ मुले जन्मायला हवीत. औरंगाबाद ५६, नाशिक ५८, जालना आणि जळगावला तीन ते चारच का? नाशिकवाल्यांनी ठेकेदारी घेतली आहे काय? मला महिन्याला साडेसहा लाख खर्च होतो, तो कोठून काढायचा?
अॅड.पाटील : जेदेणारे आहेत, त्यांच्याकडून काढा. ज्यांची ऐपत नाही. ते कसे देणार?
धोका: प्रत्येकाचीक्षमता असते. आपल्याशी माझा काही वाद नाही.
अॅड.पाटील : तुमच्याशीहीमाझा काही वाद नाही. आपण पहिल्यांदाच भेटतोय.
धोका: पाचमहिन्यांपासून आयांचा पगार नाही. स्टाफचा खर्च कसा काढणार? एका मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी ११ लाख ३० हजार जहाँगीर हॉस्पिटलमध्ये खर्च केले. १० टक्के व्याजाने पैसे काढून भरले. दोन कोटी रुपयांनी फसलो. जालन्यात कुणालाही विचारा... काही वाईट बोलल्यास माफ करा.
अॅड.पाटील : तुम्हीमोठे माणूस आहात.
धोका: मुंदडाजींच्याबंगल्यावर या. तेथे भेटू... या नंतर संवाद संपतो.
बातम्या आणखी आहेत...