आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार दिवसांत तीन दुचाकींची चाेरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जानेवारी महिन्यापासून शहरात दुचाकी चाेरट्यांनी धुमाकूळ घातला अाहे. चार दिवसांत शहरातून पुन्हा तीन माेटारसायकल अाणि दाेन सायकली चाेरी झाल्या.
बुधवारी गजानन पाटील (वय ५६, रा. बळीरामपेठ) यांनी त्यांची दुचाकी (क्र. एमएच-१९-बीबी-४७४६) गाेलाणीच्या मागे असलेल्या दत्त मंिदराजवळ लावलेली हाेती. ती सकाळी ७.३० ते ८.३० वाजता चाेरट्यांनी लंपास केली. याच ठिकाणी बुधवारी अासाेदा येथील भूषण िशंपी (वय २२) यांनी दुचाकी (क्र. एमएच-१९-बीडी-८९६९) लावली हाेती. काम संपवून परत अाल्यावर जागेवर दुचाकी नव्हती. याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात नाेंद करण्यात अाली अाहे. फेब्रुवारीला भूपेंद्र साेनवणे (रा. नांद्रा बुद्रूक) यांनी त्यांची दुचाकी (क्र. एमएच-१९-एएल-०९२९) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात लावली हाेती. मात्र, काम संपवून परत अाल्यावर दुचाकी जागेवर नव्हती.

सायकली लांबवल्या : नुरानीमशीद समाेरून राेजी महंमद अन्वर सिद्दिकी (रा. शाहूनगर) यांची सायकल चाेरट्यांनी लांबवली. तर राेजी सकाळी ११ वाजता श्यामकांत हिरामण अहिरे (रा. दिनकरनगर) यांची सायकल रेल्वे स्थानक परिसरातील एटीएम समाेरून चाेरी झाली अाहे.

काट्याफैलमधून प्राणी, पक्षी चाेरी
जळगाव काट्याफैलपरिसरातून बुधवारी पहाटे चाेरट्यांनी एका हाैशी पक्षी, प्राणीमित्राचे ९७ हजार रुपयांचे प्राणी चाेरून नेले अाहेत. याप्रकरणी शनिपेठ पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

काट्याफैल भागातील नईम खान रहीम खान (वय ५२) यांना प्राणी, पक्षी पाळण्याचा छंद अाहे. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या जातींचे बाेकड, बकऱ्या पाळल्या अाहेत. त्यांच्या साेबतीला पंजाब, हैदराबाद, नाशिक, धुळे, मालेगाव येथून कबुतरे पाळण्यासाठी अाणले हाेते. घरासमाेरील रिकाम्या जागेत वेगवेगळ्या पिंजऱ्यांमध्ये ते ठेवले हाेते. चाेरट्यांनी बुधवारी पहाटे लाेखंडी पिंजऱ्याचे कुलूप ताेडून ४० हजारांच्या पाच बकऱ्या, ५५ हजारांचे ४१ वेगवेगळ्या जातींची कबुतरे, दाेन हजार किमतीच्या सहा काेंबड्या चाेरट्यांनी लंपास केल्या. विशेष म्हणजे घटनास्थळ शनिपेठ पाेलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर अाहे. तरीदेखील चाेरी झाल्याने अाश्चर्य व्यक्त हाेत अाहे.

सीसीटीव्ही तपासले
शनिपेठ पाेलिसांनी नॅशनल जिम चाैक तसेच दाेन ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले आहेत. त्यात दाेन चारचाकी या भागातून गेल्याचे दिसत अाहे. त्या गाड्यांवर पाेलिसांना संशय असून ते त्यादृष्टीने तपास करीत अाहेत.