आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वार्षिक सरासरीच्या ३० टक्क्यांवर पाऊस, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून गेल्या २४ तासांत वार्षिक सरासरीच्या ३० टक्के इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर जून 1 ते ११ जुलैपर्यंत जिल्ह्यात २०७.७ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान विभागाने केली आहे. खरिपाच्या पेरणीनंतर अर्धा जून महिना कोरडा गेल्याने शेतकरीवर्ग धास्तावला होता. मात्र, जूनच्या अखेरीस पावसाची लक्षणे दिसू लागल्याने शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या.
जिल्ह्यात जून अखेरीस अनेक भागात दमदार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे पाण्याअभावी कोमेजलेल्या नाजूक पिकांना जीवदान मिळाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले. रविवारपासून सुरू झालेला पाऊस सोमवारीही दिवसभर होता. गेल्या आठवड्यात अमळनेर, पारोळा, भडगाव, चाळीसगाव, एरंडोल आदी तालुक्यात वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. यात अनेक घरांची पडझड झाली. तर भडगाव तालुक्यात विजेचा शॉक लागून दोन बैल मृत झाले. अमळनेर, पारोळा, धरणगाव आदी तालुक्यांमध्ये तर अनेक शेतजमिनीच्या मातीची धूप झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत वार्षिक सरासरी ६६३.३ मिलिमीटर पाऊस झाला होता. मात्र, यंदा गेल्या महिनाभरात वार्षिक सरासरीच्या २०७.७ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. सोमवारपर्यंत पावसाची वार्षिक सरासरीची टक्केवारी ३१.३ टक्के आहे.

तुरीचे लागवड क्षेत्रही वाढले
गेल्यावर्षी तुरीचे उत्पादन प्रचंड घट वाढलेले भाव यामुळे यंदा तुरीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. जिल्ह्यात १७०.४७ हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड होण्याबाबत कृषी विभागाचा अंदाज होता .प्रत्यक्षात १८६.९३ हेक्टर क्षेत्रावर तूर लागवड झाली आहे. तर मुगाची ३२९.२७ हेक्टरवर पेरणी झाली.उडीद पिकाची ३१०.२९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर उर्वरित पेरण्या आंतरमशागतीच्या कामांनना वेग येईल. येत्या आठवडाभरात पेरणी क्षेत्रात वाढ होईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी सांगितले.
जिल्ह्यात ७२ टक्के पेरण्या
जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे पेरण्यांना वेग अाला असून सोमवार अखेर ७२.७२ टक्के खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात एकूण पेरणीचे क्षेत्र हजार ३३२.१६ हेक्टर असून त्यापैकी ६१२१.५३ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात सर्वाधिक हेक्टर क्षेत्र कपाशीखाली आहे. आतापर्यंत ३६४०.२८ हेक्टर क्षेत्रावर कपाशी लागवड करण्यात आली आहे.तेलबियाखालील क्षेत्र २९९.५७ हेक्टर असून त्यापैकी २८६.६९ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. सोयाबीनच्या पेऱ्यात वाढ झाली आहे.

भिज पावसामुळे धरणसाठ्यात वाढ नाही
गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असला तरी, जलयुक्त शिवारातील नालाखोलीकरण भिजपावसामुळे धरणात पाणी आल्याचे सांगितले जात आहे. जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात ४५.२ टक्के सर्वाधिक जलसाठा आहे. मात्र, हा जलसाठा गेल्या वर्षाचा आहे. हतनूर धरणाच्या वरील भागामध्ये जोरदार पाऊस होत असल्याने धरणाचे चार दरवाजे पूर्णत: आणि ३२ दरवाजे अंशत: उघडले अाहेत. हतनूरमध्ये केवळ १३.१० टक्के साठा आहे. गिरणा धरणात शून्य टक्के जलसाठा आहे. एकूण सर्व मध्यम प्रकल्पांमध्ये १६.२३ टक्के जलसाठा आहे. मन्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, हिवरा, बहुळा, अंजनी या प्रकल्पांमध्ये सोमवारपर्यंत शून्य टक्के जलसाठा होता.
पुढे वाचा... एरंडोलला सर्वाधिक पाऊस
बातम्या आणखी आहेत...