आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीत 30 टक्के पोलिस कर्मचारी सुटीवर; इतरांवर तणाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दिवाळीसणानिमित्त बाजारात तेजी आली आहे. यातच गर्दीच्या ठिकाणी चोरी, हातसफाईचे प्रकारही वाढत आहेत. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर याचा अतिरिक्त ताण आला आहे. अशातच दिवाळीच्या दिवशी सुमारे ३० टक्के कर्मचारी सुटीवर जाणार असल्यामुळे या तणावात भर पडणार आहे. 
 
ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मंगळवारपासून पोलिस सज्ज झाले आहेत. संप काळात प्रवाशांची सुरक्षा, खासगी वाहनांतून प्रवासी वाहतूक करण्यास मिळालेल्या परवानगीमुळे अपघातांवर नियंत्रण ठेवणे ही कामे वाढली आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एकूण मनुष्यबळापैकी सुमारे ३० टक्के अधिकारी, कर्मचारी सुटीवर जाणार आहेत. या वेळी उर्वरित कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम करावे लागणार आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...